वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार हिंदुत्वनिष्ठ आमदार महेश लांडगे यांना घोषित.
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला क्रांतिवीर "वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार'" लढाऊ हिंदुत्वनिष्ठ आमदार महेश लांडगे यांना घोषित. पंढरपूर(प्रतिनिधी )_थोर क्रांतिकारक वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार यंदाच्या वर्षी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांना बहाल करण्यात येणार आहे. क्रांतिवीर वसंतदादा बडवे हे स्वातंत्र लढा, गोवामुक्ती लढा, मराठवाडा मुक्ती लढा, यांतील अग्रगण्य सेनानी होते कडवे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर,भालजी पेंढारकर, सुधीर फडके बाबासाहेब पुरंदरे यांचे सहकारी होते. पंढरपुरातील समाज सुधारक तालीम क्षेत्रातील मातब्बर अशी त्यांची प्रसिद्धी होते. बचाव कार्यामुळे १९५६ च्या महापुरातील देवदूत अशी त्यांची प्रतिमा होती. पंढरपुरात श्री. विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर महत्त्वाच्या जागी त्यांचा पुतळा विराजमान आहे. महाराष्ट्रात कडवे हिंदुत्वनिष्ठ कार्य करणाऱ्या लढवय्याला क्रांतिवीर बडवे दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त सदरचा पुरस्कार दिला जातो . आजवर हा पुरस्कार गोरक्षक श्री मिलिंदजी एकबोटे,शिवशंकर स्वामी, धनंजय भाई देसाई,सनातनचे अभयवर्तक, ...