वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार हिंदुत्वनिष्ठ आमदार महेश लांडगे यांना घोषित.
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला क्रांतिवीर "वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार'" लढाऊ हिंदुत्वनिष्ठ आमदार महेश लांडगे यांना घोषित.
पंढरपूर(प्रतिनिधी )_थोर क्रांतिकारक वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार यंदाच्या वर्षी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांना बहाल करण्यात येणार आहे.
क्रांतिवीर वसंतदादा बडवे हे स्वातंत्र लढा, गोवामुक्ती लढा, मराठवाडा मुक्ती लढा, यांतील अग्रगण्य सेनानी होते कडवे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर,भालजी पेंढारकर, सुधीर फडके बाबासाहेब पुरंदरे यांचे सहकारी होते. पंढरपुरातील समाज सुधारक तालीम क्षेत्रातील मातब्बर अशी त्यांची प्रसिद्धी होते. बचाव कार्यामुळे १९५६ च्या महापुरातील देवदूत अशी त्यांची प्रतिमा होती. पंढरपुरात श्री.
विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर महत्त्वाच्या जागी त्यांचा पुतळा विराजमान आहे.
महाराष्ट्रात कडवे हिंदुत्वनिष्ठ कार्य करणाऱ्या लढवय्याला क्रांतिवीर बडवे दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त सदरचा पुरस्कार दिला जातो .
आजवर हा पुरस्कार गोरक्षक श्री मिलिंदजी एकबोटे,शिवशंकर स्वामी, धनंजय भाई देसाई,सनातनचे अभयवर्तक, संजीव पुनाळेकर, कर्नाटक श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, सुप्रसिद्ध कन्नड लेखक एस एल भैरप्पा,ह. भ. प. बंडातात्या कराडकर सहकारी, हिरामण गवळी धुळे,इ. मान्यवरांना दिला गेला आहे.
सदर पुरस्काराचे स्वरुप, मानाचे महावस्त्र, कुंडलिनी कृपाणांकित भगवा ध्वज, अकरा सहस्त्र रूपये रोख असून, कै. बडवे यांच्या श्री. विठ्ठल मंदिराशेजारील पुतळ्यापाशी, पंढरपूरातील मान्यवर साधूसंत महाराजांचे हस्ते प्रदान होतो.
. महाराष्ट्रात आपल्या लढाऊ कट्टर हिंदुत्वनिष्ठे मुळे आमदार महेश दादा लांडगे हे सुप्रसिद्ध आहेत.गोरक्षणाविषयी त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे.जुन्नर भागातील बेकायदा कत्तलखाने त्यांनी मोडून काढले आहेत.लव जिहाद लँड जिहाद याविषयीही ते सदैव आक्रमकतेने लढत आहेत.महाराष्ट्र विधानसभेत ही त्यांनी हिंदुत्वाच्या लढ्याचा गजर केलेला आहे. देशद्रोही ह्यांच्या कुदळवाडी अतिक्रमणाविषयी त्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा १४० फूटी पुतळ्यासाठी ते प्रयत्नशील असून ते हिंदूभूषण असे कार्य जगात प्रसिद्ध होणार आहे. नुकतेच त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक संख्येने ढोल ताशांचे वाद्यवादन झालेले आहे.
. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी येत्या रविवार दिनांक १८ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता क्रांतिवीर वसंत दादा बडवे यांच्या विठ्ठल मंदिराच्या शेजारील पुतळ्यापाशी त्यांना सदरचा पुरस्कार
आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर व आणखी काही साधसंतांच्या हातून दिला जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला पंढरपूरकरांनी अवश्य उपस्थिती लावावी असे आवाहन क्रांतिवीर वसंत दादा बडवे स्मारक मंडळाचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णीइचगावकर, पत्रकार व माजी नगरसेवक महेश खिस्ते, विवेक बेणारे, व शहर हिंदू महासभेचे अध्यक्ष विकास मोरेकाका आदींनी केले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment