Posts

Showing posts from August, 2026

बारा तोळे सोने, तीस भार चांदी जप्त, पंढरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

Image
  बारा तोळे सोने आणि तीस भार चांदी जप्त चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात पंढरपूर शहर पोलीसांना यश पंढरपूर : पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या"गुन्हे प्रकटीकरण शाखेने 12.50 तोळे सोन्याचे दागिणे व 30 भार चांदीचे घरफोडीत चोरी झालेले दागिणे  धडाकेबाज कामगीरी करत आरोपीकडुन १७ लाख १,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. 25 रोजी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखळ झाला होता. त्याअुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत होती. पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेने विशेष पथके नेमले. पंढरपुर शहर व आजुबाजूचे सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात आरोपी  सुनिलकुमार रामसिंग राजपूत (वय. २६)  रा. मुळग्राम बिकापुरी, पोस्ट हिरापुरा भिंड. मध्यप्रदेश, संध्या रा. आढेगाव टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापूर यास ताब्यात घेतले.दि.२७ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १२.५० तोळे सोन्...

आनंदाची बातमी, श्री पांडुरंग साखर कारखाना यांच्या वतीने केवळ २५रु किलो दराने साखर सभासदांसाठी मिळणार, ३१ऑगस्ट पासून वाखरी येथील कार्यालयातून वाटप.

Image
 पांडुरंग साखर कारखान्याकडून सभासदांसाठी २५ रुपये किलो दराने साखर, ३१ ऑगस्ट पासून वाटप सुरू.  पंढरपूर(प्रतिनिधी )_कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूरकडून सभासदांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने दर्जेदार साखर अत्यल्प दरात म्हणजेच प्रति किलो २५ रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही साखर वाटप योजना सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाखरी कार्यालयातून तसेच श्रीपूर येथील कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्रातून सभासदांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, साखर वाटप फक्त सभासदांसाठीच करण्यात येणार असून, साखर घेण्यासाठी सभासदांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. दरम्यान, बाजारातील साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने आपल्या सभासदांसाठी केवळ २५ रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संपादक  चैतन्य उत्पात

सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर करणार,_मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
 *सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार* - *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*   मुंबई, (प्रतिनिधी )पंढरपूरच्या विकास आराखड्यात वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागण्यांचा समावेश करून सर्वांना विश्वासात घेतच आराखडा अंतिम करण्यात येईल. पंढरपूरचा विकास हा पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे, दरवर्षी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.         सह्याद्री अतिथीगृह येथे पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नागपूरचे जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पंढरपूरचे उपविभागीय अ...

पंढरपूर येथील पद्मावती जलतरण तलावात बुडून राजस्थानी युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

Image
 पंढरपूर येथे  नगरपालिकेच्या पद्मावती स्विमिंग टॅंक मध्ये युवकाचा बुडून मृत्यू.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर येथील नगरपालिकेच्या स्विमिंग टॅंक (पद्मावती)  येथे सोमवार दि.२४ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयत युवकाचे नाव नरपत सिंग २१वर्षे, रा.असलाई जिल्हा जोधपुर ,राजस्थान,असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर युवक मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने / खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या सहकाऱ्याने दोर टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच  तलाव व्यवस्थापन]यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने युवकास पाण्याबाहेर काढले. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पंढरपूर शहर  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण...

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने पंढरपूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

Image
 पंढरपूर येथे लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने सोमवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने सोमवार दि.२४ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सोसायटी चे पंढरपूर येथील व्यवस्थापक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली, सांगली येथील आकाशदिप नेत्रालय या नामवंत डोळ्याच्या हॉस्पिटल मधील तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स रुग्णांची डोळ्यांच्या सर्व विकारांची तपासणी करून योग्य इलाज करण्यासाठी सहकार्य करणार आहेत, सोसायटी च्या स्टेशन रोड येथील सुरवसे बिल्डिंग मधील शाखेत या तपासणी सोमवार दी २४ऑगस्ट रोजी सकाळी १०ते दुपारी ३या वेळेत घेण्यात येणार असून पंढरपूर व परिसरातील नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. देशातील चार राज्यामध्ये विस्तारलेली, लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी ग्राहकांच्या पसंतीस आली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सोसायटी यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. पंढरपूर येथे अल्प...

गादेगाव येथील युवा शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू.

Image
 पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे विजेचा शॉक लागल्याने युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे (वय २४वर्ष, रा.गादेगाव, तालुका , पंढरपूर)यांचा पळशी येथील आपल्या शेतात पाण्याची मोटार सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. एका तरुण होतकरू आणि कष्टाळू शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करत प्रगतिशील शेतकरी म्हणून त्याचे नाव घेतले जात असे, ही दुर्दैवी घटना रविवार दि२३ऑगस्ट रोजी सकाळी ६वाजता घडली, गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे यांची पळशी येथे शेती होती, पिकांना पाणी देण्यासाठी ते मोटार सुरू करण्यासाठी गेले तेव्हा उजव्या हाताला भयानक विजेचा शॉक बसला आणि ते वेगाने बाजूला पडले , पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातही काही दिवसांपूर्वी ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी  शेतकरी दांपत्याचा शेतीला पाणी देताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. गादेगाव येथे ही दुर्दैवी घटना समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे, एका जिज्ञासू युवा शेतकऱ्याचा असा दुर्द...

आवताडे शुगर ने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या _नामदार ॲड राहुल नार्वेकर.

Image
 आवताडे शुगरने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या- ना.ॲड.राहुल नार्वेकर  CBG प्रकल्पाचे भूमिपूजन व वीज वितरणाचा शुभारंभ उत्साहात संपन्न . पंढरपूर  (प्रतिनिधी)- आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. ली. या साखर कारखान्याने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या असे प्रतिपादन ना. ॲड.राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. ना. नार्वेकर यांच्या शुभहस्ते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कारखान्याचे मार्गदर्शक समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये उभारण्यात येणाऱ्या १२ TPD क्षमतेच्या CBG (Compressed Bio-Gas) प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज वितरणाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. या प्रकल्पामुळे ऊर्जानिर्मिती, पर्यायी इंधन आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार असून, उपलब्ध संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वा...

महाराष्ट्र होणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर._विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.

Image
 महाराष्ट्र होणार "आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर"                                                        - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर   युवा पिढी विकसित भारताचा पाया : नार्वेकर        पंढरपूर, दि. 21 :  आजचा युवक तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे जात आहे. युवा पिढी हाच विकसित भारताचा पाया आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन त्याचा योग्य वापर केला, तर केवळ आपले राज्यच नाही तर देशाचीही प्रगती होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या काळात महाराष्ट्र "आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर" बनणार आहे. जगातील अनेक देशांचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम महाराष्ट्र करेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.        पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी महाविद्यालयात "ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची ...

सुप्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी घेतला पंढरपुरी पेंडपाल्याचा आस्वाद, श्रीकांत महाजन बडवे यांच्या रेस्टॉरंट मध्ये पाठक यांनी घेतला आस्वाद.

Image
 सुप्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी घेतला पंढरपुरी पेंडपाल्याचा आस्वाद  पंढरपूर (प्रतिनिधी)_सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेता संदीप पाठक यांनी अस्सल पंढरपुरी बेत असलेल्या पेंडपाला आणि पोळीवर ताव मारला, सिने कलाकार श्रीकांत बडवे यांच्या  महाजन फूड्स येथे अभिनेते संदीप पाठक यांनी भेट देऊन अस्सल पंढरपुरी पेंडपाल्याचा मनमुराद आस्वाद घेतला. पंढरपूरच्या मातीतली अस्सल चव आणि आपुलकीचा अनुभव घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.  पंढरपूर येथे उत्पात समाजाच्या पेशवेकालीन बैठकीच्या लावणी चा अभ्यास करण्यासाठी ते उत्पात गल्ली येथील सुप्रसिद्ध लावणीकार मनोहर उर्फ छबुराव उत्पात यांच्या शि चर्चा करण्यासाठी मंगळवार दि१८रोजी आले होते. यावेळी महाजन फूड्सच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.  कलाकारांची भेट, मनमोकळ्या गप्पा आणि पंढरपुरी खाद्यसंस्कृतीची अविस्मरणीय मेजवानी  असा दुग्धशर्करा योग येथील कलाकारांना आला, यावेळी प्राध्यापक मंदार परिचारक तसेच शहरातील रंगभूमी कलाकार उपस्थित होते. पाठक यांनी तेव्हाची आणि आताची रंगभूमी, प्रायोगिक र...

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची श्रीमंती_ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख.

Image
 ...हीच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची श्रीमंती- ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख  वाखरी येथे धार्मिक व सामाजिक उपक्रमाने पुण्यतिथी साजरी. पंढरपूर(प्रतिनिधी)- एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यातून समाजासाठी निर्माण केलेली संपत्ती, संस्कार आणि केलेली सेवा हीच त्यांची खरी श्रीमंती असते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या चरणी सेवा रुजू करण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करणे ही आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचे  भावोद्गार ह. भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त काढले. पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, पांडुरंग परिवाराचे नेते तथा माजी आमदार श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांचे भक्तिमय कीर्तन संपन्न झाले. यावेळी कीर्तनातून जगन्नाथ महाराज यांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा गौरव करत त्...

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे लेपन प्रक्रियेस उच्च न्यायालयाची परवानगी, लेपन विरोधी याचिका फेटाळली.

Image
 मूर्ती लेपन विरोधी फेटाळली;  तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी, पंढरपूर, दि. ७(प्रतिनिधी): श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने घेतलेल्या भूमिकेला मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ कोल्हापूर यांनी दिनांक ७ऑगस्ट  रोजी दिलेल्या अंतिम आदेशाद्वारे महत्त्वपूर्ण न्यायालयीन अधिमान्यता दिली असल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींची होणारी झीज व नुकसान रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या शिफारशीनुसार आवश्यक संवर्धनात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने घेतला होता. या कार्यवाहीस आक्षेप घेऊन श्री गणेश लंके व बाळासाहेब डिंगरे आणि इतर या याचिकाकर्त्यांनी मा. न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, तज्ज्ञांचे अहवाल तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींचा सविस्तर विचार करून आज अंतिम आदेश पारित केला. मा. उच्च न्यायालयाने पंढर...

इनरव्हील क्लब( पर्ल्स ) यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना एक दिवसाचे भोजन, नाश्ता वाटप.

Image
 इनरव्हील क्लब(पर्ल्स )च्या वतीने व्यास नारायण झोपडपट्टी मधील पूरग्रस्तांना एक दिवसाचे भोजन व नाश्ता वाटप  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी मध्ये पुराचे पाणी शिरल्याने सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था रायगड भवन उप जिल्हा रुग्णालय समोर करण्यात आली असून इनरव्हिल क्लब ऑफ पंढरपूर (पर्ल्स ) यांच्या वतीने या पूरग्रस्तांना  गुरुवार दि.६ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसट यांच्या नेतृत्वाखाली  एक दिवसाचा नाश्ता, दोन वेळचे भोजन  देण्यात आले, यावेळी पंढरपूर अध्यक्षा सौ मीनल शिंदे, सचिव पल्लवी उपाध्ये, सदस्या सौ मनिषा भुजबळ, सौ प्रिया कौलवार, सौ रसिका वाघमोडे, सौ सेजल शिंदे आदी उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्षा सौ मीनल शिंदे म्हणाल्या, आमची इनरव्हिल क्लब ही एक सामाजिक संस्था असून या पूरग्रस्तांना मदतीची गरज होती म्हणून पूर्ण एक दिवसाचे भोजन, नाश्ता देण्यात आला, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री विक्रम शिरसट यांनी या कार्यात मोठी मदत केली, सचिवा सौ पल्लवी उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करत मदतीचा हात दिला असे...

भाजप पक्षाच्या वतीने गोपाळपूर येथे शेतकरी महिलांना कृषीवाण वाटप, उत्साहात कार्यक्रम संपन्न.

Image
 पंढरपूर येथील गोपाळपूर मध्ये भाजप कडून शेतकरी महिलांना कृषी वाण वाटप कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा,   पंढरपूर(प्रतिनिधी)_, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या गावांमध्ये शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील सर्व शेतकरी महिलांना कृषीवाण वाटप अत्यंत उत्साहामध्ये पार पडले  दोन जुलै रोजी महिला शेतकरी विधेयक हे विधानसभेमध्ये पारित झाले आणि त्याचबरोबर २२ जुलै रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  शेतकरी महिलांना आज या कृषीवाण वाटप करण्याचा कार्यक्रम गोपाळपूर या ठिकाणी पार पडला  यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉ प्राजक्ता बेणारे, या म्हणाल्या की भारतीय जनता पार्टीने कायमच महिलांचा सन्मान केलेला आहे म्हणून जास्तीत जास्त योजना या महिलांना लाभ देणारे आहेत आणि आता हे शेतकरी महिला विधेयक पारित केल्यामुळे महिला या मुख्य प्रवाहात येतील आणि पुरुष शेतकऱ्यांच्या प्रमाणे त्यांना या निर्णयामुळे सर्व लाभ मिळतील  त्याचबरोबर महिलांच्या सक...

श्री पांडुरंग अन्नछत्र ट्रस्ट यांच्या वतीने आषाढी वारी मध्ये राबणाऱ्या पोलीस बांधवांना महाप्रसाद भोजन.

Image
 आषाढी वारी मध्ये राबणाऱ्या पोलिस बांधवाना श्री पांडुरंग अन्नछत्र मंडळाकडून  महाप्रसाद.  पंढरपूर(प्रतिनिधी )_जन्माचे सार्थक करणारी आषाढी वारी नुकतीच पार पडली, मात्र या आषाढी वारी मध्ये रात्र दिवस कडक बंदोबस्त ठेवून भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबणाऱ्या पोलीस बांधव आणि पत्रकार मंडळी यांना श्रम परिहार भोजनाची मेजवानी श्री पांडुरंगअन्नछत्र मंडळ आणि यांच्या वतीने विजापूर गल्ली येथील श्री पांडुरंग भवन येथे देण्यात आली, यावेळी श्री पांडुरंग भवन चे श्री अनिरुद्ध पाटील,समाजसेवक, कलाकार श्रीकांत महाजन बडवे , अक्षय बडवे उपस्थित होते, यावेळी सर्व पोलिस बांधव, पत्रकार यांचा श्री विठ्ठलाचा फोटो, शाल, श्रीफळ, टॉवेल आदी देऊन सत्कार करण्यात आला. श्री पांडुरंग चे श्री अनिरुद्ध पाटील यांचे आदरातिथ्य पाहून सर्व पोलीस भारावून गेले, गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम ते चालवित असून मिष्ठान्न भोजनाचा सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी साडे तीन हजार पोलीस बांधव  यांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

वाढदिवस असूनही कर्तव्याला प्राधान्य देऊन आ अभिजीत पाटील यांनी शिकागो येथील ऊसशेतीची पाहणी केली.

Image
 वाढदिवस असूनही कर्तव्याला प्राधान्य देऊन आ. अभिजीत पाटील यांनी शिकागो येथील ऊसशेतीची पाहणी केली.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील सुपुत्र आणि  माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील  यांनी शिकागो येथील एका ऊसाच्या शेतात आपला वाढदिवस साजरा केला.  अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आ . पाटील गेले होते अमेरिकन ऊसशेती आणि भारतीय पद्धती यात कोणता फरक आहे याची पाहणी त्यांनी केली, कायमच अभ्यासू आणि जिज्ञासु विचार असलेले आ.अभिजीत पाटील यांच्या या  भेटीचा निश्चितच मोठा फायदा भारतीय ऊसशेतीला होणार आहे, वाढदिवस असूनही शेतीची पाहणी करत  शेतीविषयीची आपली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे. शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील ३२ आमदार सहभागी झाले होते. त्यामध्ये आमदार अभिजीत पाटील यांचाही समावेश होता. परिषदेनंतर त्यांनी अमेरिकेतील शेतीपद्धती, सिंचन व्यवस्था आणि अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. यावेळी महाराष्ट्रातील मूळचे डॉ. बालाजी आगलावे या...

वारीचा शिणवटा घालविण्यासाठी स्थानिकांची मिनी एस्सेल वर्ल्ड कडे धाव मनोरंजन नगरी गर्दीने फुलली.

Image
 वारीचा शीणवटा घालविण्यासाठी    स्थानिकांची   मिनी एस्सेल वर्ल्ड कडे धाव, मनोरंजन नगरीतून होते लाखोंची उलाढाल. चैतन्य उत्पात  आषाढी वारी उत्तम भरली असल्याने पंढरपूर शहराचे अर्थकारण चांगले झाले आहे, यंदाच्या आषाढी वारी मध्ये अंदाजे २५ते लाख३२ भाविक आले होते  आषाढी वारीमध्ये बाल गोपाळासह अनेकाचे आकर्षण असलेले मिनी एस्सेल वर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून ही मायावी अद्‌भूत मनोरंजननगरी कडे हजारो भाविकांची पावले आपसूकच वळवत आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ही मायावी नगरी येथील पी टी ग्राउंड वर येते. उंचच उंच आकाशपाळणा हे सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो. इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून  स्वप्ननगरी पंढरपूर शहराने सौंदर्य अलौकिक असते. रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो, हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला जागतात, आनंद, जोश, अनोखे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभवभाविकांसह शहरवासीय अनुभवत आहेत. खिशाला परवडेल अशा माफक दरात विविध राईड्...

भीमा नीरा नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी._, प्रांताधिकारी सचिन इथापे

Image
 निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी                                                                      -प्रांताधिकारी  सचिन इथापे उजनी धरणातून ८० हजार तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेक्स विसर्ग         प्रतिनिधी पंढरपूर ,_ उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी ४ वाजता उजनी धरणातून ८० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ विसर्ग असा एकूण १ लाख ४३ हजार ३२३ क्युसेक्स इतका विसर्ग  सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.          ...