लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने पंढरपूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर


 पंढरपूर येथे लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने सोमवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने सोमवार दि.२४ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सोसायटी चे पंढरपूर येथील व्यवस्थापक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली,

सांगली येथील आकाशदिप नेत्रालय या नामवंत डोळ्याच्या हॉस्पिटल मधील तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स रुग्णांची डोळ्यांच्या सर्व विकारांची तपासणी करून योग्य इलाज करण्यासाठी सहकार्य करणार आहेत,

सोसायटी च्या स्टेशन रोड येथील सुरवसे बिल्डिंग मधील शाखेत या तपासणी सोमवार दी २४ऑगस्ट रोजी सकाळी १०ते दुपारी ३या वेळेत घेण्यात येणार असून पंढरपूर व परिसरातील नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

देशातील चार राज्यामध्ये विस्तारलेली, लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी ग्राहकांच्या पसंतीस आली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सोसायटी यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात.

पंढरपूर येथे अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला असून अर्थ सेवेबरोबरच समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत या संधीचा गरजू लोकांनी लाभ घ्यावा.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.