श्री पांडुरंग अन्नछत्र ट्रस्ट यांच्या वतीने आषाढी वारी मध्ये राबणाऱ्या पोलीस बांधवांना महाप्रसाद भोजन.
आषाढी वारी मध्ये राबणाऱ्या पोलिस बांधवाना श्री पांडुरंग अन्नछत्र मंडळाकडून महाप्रसाद.
पंढरपूर(प्रतिनिधी )_जन्माचे सार्थक करणारी आषाढी वारी नुकतीच पार पडली, मात्र या आषाढी वारी मध्ये रात्र दिवस कडक बंदोबस्त ठेवून भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबणाऱ्या पोलीस बांधव आणि पत्रकार मंडळी यांना श्रम परिहार भोजनाची मेजवानी श्री पांडुरंगअन्नछत्र मंडळ आणि यांच्या वतीने विजापूर गल्ली येथील श्री पांडुरंग भवन येथे देण्यात आली,
यावेळी श्री पांडुरंग भवन चे श्री अनिरुद्ध पाटील,समाजसेवक, कलाकार श्रीकांत महाजन बडवे , अक्षय बडवे उपस्थित होते,
यावेळी सर्व पोलिस बांधव, पत्रकार यांचा श्री विठ्ठलाचा फोटो, शाल, श्रीफळ, टॉवेल आदी देऊन सत्कार करण्यात आला.
श्री पांडुरंग चे श्री अनिरुद्ध पाटील यांचे आदरातिथ्य पाहून सर्व पोलीस भारावून गेले,
गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम ते चालवित असून मिष्ठान्न भोजनाचा सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी साडे तीन हजार पोलीस बांधव
यांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला.


Comments
Post a Comment