भाजप पक्षाच्या वतीने गोपाळपूर येथे शेतकरी महिलांना कृषीवाण वाटप, उत्साहात कार्यक्रम संपन्न.


 पंढरपूर येथील गोपाळपूर मध्ये भाजप कडून शेतकरी महिलांना कृषी वाण वाटप कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा, 


 पंढरपूर(प्रतिनिधी)_, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या गावांमध्ये शनिवार दि.१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील सर्व शेतकरी महिलांना कृषीवाण वाटप अत्यंत उत्साहामध्ये पार पडले 

दोन जुलै रोजी महिला शेतकरी विधेयक हे विधानसभेमध्ये पारित झाले आणि त्याचबरोबर २२ जुलै रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 

शेतकरी महिलांना आज या कृषीवाण वाटप करण्याचा कार्यक्रम गोपाळपूर या ठिकाणी पार पडला 

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉ प्राजक्ता बेणारे, या म्हणाल्या की भारतीय जनता पार्टीने कायमच महिलांचा सन्मान केलेला आहे म्हणून जास्तीत जास्त योजना या महिलांना लाभ देणारे आहेत आणि आता हे शेतकरी महिला विधेयक पारित केल्यामुळे महिला या मुख्य प्रवाहात येतील आणि पुरुष शेतकऱ्यांच्या प्रमाणे त्यांना या निर्णयामुळे सर्व लाभ मिळतील 

त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये आणि महिलांना जास्तीत जास्त प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्ष आणि  आमदार  चित्राताई वाघ यांचं कायमच महाराष्ट्रातील महिलांच्या वरती अतिशय बारीक लक्ष आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माय माऊली ही चित्राताई वाघ यांच्या पंखाखाली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही खुट्ट वाजलं कुठल्या महिलेवर अन्याय झाला किंवा कुठल्या महिलेला योजनांचा लाभ मिळाला नाही यासाठी आदरणीय चित्रा  या सतत सतर्क असतात आणि ज्या भागांमध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्या कायमच प्रोत्साहित करत असतात आणि महिलांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतात 

यावेळी बोलताना प्राजक्ता बेणारे  म्हणाल्या की चित्रा ताईंच्या बद्दल बोलायचं म्हणल्यास, जगत जननी संत सखी जनाबाईंच्या अभंगांमध्ये एक ओळ आहे की, घार हिंडते आकाशी, झेप घाली पिल्लापाशी 

महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊल्यांच्या साठी चित्राताई कायमच उभ्या असतात आणि महिलांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक सांस्कृतिक राजकीय घडामोडीमध्ये चित्राताईंचा सिंहीणीचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही 

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष  शशिकांत नाना चव्हाण , तालुकाध्यक्ष सुभाष मस्के , जिल्हा उपाध्यक्ष  प्रणव  परिचारक, भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्ह्याच्या सरचिटणीस व जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे 

गोपाळपूर येथील सरपंच पांडुरंग देवमारे,, उपसरपंच विक्रम आसबे,  मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व लोक आणि ग्रामस्थ महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या 

महिलांना हे कृषीवाण घेऊन अतिशय आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी जेवढा महिलांचा सन्मान करते तेवढ्या कधी इतर पक्षांनी केलेला नाही अशा भावना या ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केल्या.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.