इनरव्हील क्लब( पर्ल्स ) यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना एक दिवसाचे भोजन, नाश्ता वाटप.


 इनरव्हील क्लब(पर्ल्स )च्या वतीने व्यास नारायण झोपडपट्टी मधील पूरग्रस्तांना एक दिवसाचे भोजन व नाश्ता वाटप

 पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी मध्ये पुराचे पाणी शिरल्याने सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था रायगड भवन उप जिल्हा रुग्णालय समोर करण्यात आली असून इनरव्हिल क्लब ऑफ पंढरपूर (पर्ल्स )

यांच्या वतीने या पूरग्रस्तांना  गुरुवार दि.६ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसट यांच्या नेतृत्वाखाली  एक दिवसाचा नाश्ता, दोन वेळचे भोजन  देण्यात आले,

यावेळी पंढरपूर अध्यक्षा सौ मीनल शिंदे, सचिव पल्लवी उपाध्ये, सदस्या सौ मनिषा भुजबळ, सौ प्रिया कौलवार, सौ रसिका वाघमोडे, सौ सेजल शिंदे आदी उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्षा सौ मीनल शिंदे म्हणाल्या,

आमची इनरव्हिल क्लब ही एक सामाजिक संस्था असून या पूरग्रस्तांना मदतीची गरज होती म्हणून पूर्ण एक दिवसाचे भोजन, नाश्ता देण्यात आला, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री विक्रम शिरसट यांनी या कार्यात मोठी मदत केली,

सचिवा सौ पल्लवी उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करत मदतीचा हात दिला असे म्हटले,

 विक्रम शिरसट म्हणाले पूरग्रस्त स्थलांतरित कुटुंबांना इनरव्हिल क्लब यांनी एक दिवसाचे भोजन, नाश्ता दिला असे सामाजिक उपक्रम राबविले गोरगरीब,  दीनदुबळ्या लोकांची चांगली सोय केली, श्री विठ्ठल रुक्मिणी माता असे उपक्रम राबविण्याची सद्बुद्धी सर्वांना देवो.

असे शिरसट म्हणाले 

यावेळी संपत सर्जे, किशोर जमदाडे, महादेव माने महावीर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.