सुप्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी घेतला पंढरपुरी पेंडपाल्याचा आस्वाद, श्रीकांत महाजन बडवे यांच्या रेस्टॉरंट मध्ये पाठक यांनी घेतला आस्वाद.


 सुप्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी घेतला पंढरपुरी पेंडपाल्याचा आस्वाद

 पंढरपूर (प्रतिनिधी)_सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेता संदीप पाठक यांनी अस्सल पंढरपुरी बेत असलेल्या पेंडपाला आणि पोळीवर ताव मारला,

सिने कलाकार श्रीकांत बडवे यांच्या 

महाजन फूड्स येथे अभिनेते संदीप पाठक यांनी भेट देऊन अस्सल पंढरपुरी पेंडपाल्याचा मनमुराद आस्वाद घेतला. पंढरपूरच्या मातीतली अस्सल चव आणि आपुलकीचा अनुभव घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. 

पंढरपूर येथे उत्पात समाजाच्या पेशवेकालीन बैठकीच्या लावणी चा अभ्यास करण्यासाठी ते उत्पात गल्ली येथील सुप्रसिद्ध लावणीकार मनोहर उर्फ छबुराव उत्पात यांच्या शि चर्चा करण्यासाठी मंगळवार दि१८रोजी आले होते.

यावेळी महाजन फूड्सच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

कलाकारांची भेट, मनमोकळ्या गप्पा आणि पंढरपुरी खाद्यसंस्कृतीची अविस्मरणीय मेजवानी 

असा दुग्धशर्करा योग येथील कलाकारांना आला, यावेळी प्राध्यापक मंदार परिचारक तसेच शहरातील रंगभूमी कलाकार उपस्थित होते.

पाठक यांनी तेव्हाची आणि आताची रंगभूमी,

प्रायोगिक रंगभूमी, सिनेमा, संगीत नाटके आदी विषयांवर चर्चा केली

संपादक.

चैतन्य उत्पात..

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.