नटसम्राट नाना पाटेकर यांना कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रद्धांजली.


 *नटसम्राट नाना पाटेकर यांना कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

नटसम्राट नाना पाटेकर यांना कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!*

पंढरपूर : आपल्या दमदार अभिनयाने, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने आणि सामाजिक बांधिलकीने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर यांना कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली असून, एक संवेदनशील आणि असामान्य कलाकार आपण गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी नाना पाटेकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. नानांचा अभिनय, त्यांची संवादफेक, सामाजिक विषयांकडे पाहण्याची त्यांची संवेदनशील दृष्टी आणि सर्वसामान्य माणसाशी असलेले त्यांचे घट्ट नाते यांचा त्यांनी भावपूर्ण उल्लेख केला.

“नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते एक संवेदनशील माणूस आणि समाजाच्या वेदना आपल्या कलेतून मांडणारे महान कलाकार होते. त्यांच्या अभिनयाची जादू आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमच रसिकांच्या स्मरणात राहील,” अशा भावना skn इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाशजी करांडे सर यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप टोमके यांनी नानांच्या अभिनय पैलूचे वैशिष्ट्य विषद केले.

यावेळी सिंहगड कॉलेज, कोर्टीचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप टोमके, अभियंता राजेंद्र माळी, डॉ. किरण बहिरवाडे, बाळासाहेब नवले राजकुमार शहा, अरिहंत कोठाडिया यांच्यासह कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी नाना पाटेकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

नानांचा अभिनय अमर आहे… त्यांच्या भूमिका अजरामर आहेत… आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.