पंढरपूर येथे बालनाट्यदीन कर्मयोगी विद्यानिकेतन येथे साजरा होणार.
पंढरपूर येथे बालनाट्य दिनाचे शनिवार दि२ऑगस्ट रोजी आयोजन,
नाट्यकला जपण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पंढरपूर(प्रतिनिधी )_
पंढरपूर येथे ऐशीच्या दशकापर्यंत विविध नाट्यमंडळे व्यावसायिक व प्रायोगिक नाटके सादर करीत असत.
पंढरपूर येथील बालरंगभूमी
पंढरपूर शाखेच्या वतीने
शनिवार दि२ऑगस्ट रोजी
बालनाट्य दिन साजरा करण्यात येत असून या निमित्त बालनाट्य आणि बालनृत्य सादर करण्यात येणार आहे. कर्मयोगी विद्यानिकेतन येथे शनिवार दि२ऑगस्ट रोजी सकाळी १०वाजता बालनाट्य होणार आहे अशी माहिती अध्यक्ष अतुल अंमळनेर कर , प्रमुख कार्यवाह वैभव जोशी यांनी दिली.
मराठी_बालनाट्य_दिवस
रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्याध्यक्ष अमित वाडेकर, डॉ प्रियदर्शिनी सरदेसाई, ज्योती कुलकर्णी,
प्रमुख कार्यवाह शांताराम कुलकर्णी, सौ मीरा परिचारक, संकेत कुलकर्णी, राजेश खिस्ते, विलास जोशी, मुरलीधर शेटे, विकास वाघ, संजय पंचवाडकर , राजेश अंबिके, श्रीकांत लव्हेकर, धनंजय मनमाडकर, सौ माधुरी जोशी, सौ गौरी अंमळनेरकर, सौ अर्चना पुजारी, सौ वैशाली काशिद , सौ मीरा इरकल
आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment