महाराष्ट्राचा इतिहास दाखविणार पंढरीतील बालचमू.


 महाराष्ट्राचा इतिहास दाखविणार पंढरीतील  बालचमू.

पंढरपूर 

प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेने महाराष्ट्रातील सर्व शाखांमधून इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वाचे आकर्षण प्रत्येकाला आहेच. त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श बालकांपुढे व्हावा व त्यातूनच त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अॅड. नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


या स्पर्धेकरिता छ. शिवाजी महाराज श्री जन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक हा विषय देण्यात आला असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद यांच्या वतीने अध्यक्ष अतुल अंमळनेरकर,कार्याध्यक्ष अमित वाडेकर, प्रमुख कार्यवाह वैभव जोशी, प्रमुख मार्गदर्शक शांताराम कुलकर्णी, सौ मीरा परिचारक पंढरपूर  यांनी दिली.

 महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या २६ शाखास्तरावर प्राथमिक फेरी होणार असून, या उपक्रमात एकल गट-१ वय वर्षे ५ ते १० व एकल गट-२ वय वर्षे ११ ते १५ या वयोगटात तसेच समूह गट अशी विभागणी करण्यात आली आहे. एकल गट १ वय वर्षे ५ ते १० यांना छत्रपती शिवाजी महाराज तर एकल गट २ वय वर्षे ११ ते १५ व समूह गट यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक हा विषय देण्यात आला आहे. एकल गटात स्पर्धकांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याकाळातील कोणत्याही व्यक्तिरेखेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरुपाने तर एकल गट २ व समूह गटातील स्पर्धकांनी श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक या कालखंडातील शौर्य घटना, विविध प्रसंग, पराक्रम आदी घटनांचे संदर्भ घेत नृत्य, नाट्य, संगीत आदींचा समन्वय साधत प्रभावी सादरीकरण करावयाचे आहे. एकल गटाकरिता जास्तीत जास्त

५ मिनिटे तर समूहाकरिता जास्तीत जास्त १० मिनिटे सादरीकरणाची मर्यादा आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कोणतीही प्रवेश फी नसून, प्रत्येक सहभागी व विजेत्या स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत देण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतील प्रत्येक गटातील प्रथम आणि द्वितीय आलेल्या स्पर्धकांची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार असून ही अंतिम फेरी मुंबई येथे दि.२३ व २४ ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या बालकलावंतांचा प्रवास खर्च आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

पंढरपूर बालरंगभूमी परिषदेच्या शाखेने स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दि. १७ऑगस्ट रोजी  सुधाकरपंत परिचारक सभागृह, महावीर नगर येथे आयोजित केली आहे.

अधिक माहितीसाठी वैभव जोशी मोबाईल नंबर ९८२२२२००९८यावर संपर्क साधावा.

पंढरपूर तालुक्यातील माध्य/प्राथमिक शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे  आवाहन अधिक माहितीसाठी 

 १७  ऑगस्ट रोजी सकाळी ११ते २या वेळेत सुधाकरपंत परिचारक सभागृह महावीर नगर भाकरे हॉस्पिटल समोर येथे प्राथमिक फेरी आहे.

२३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई येथे फायनल स्पर्धा होणार आहे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा एडवोकेट नीलम शिर्के सामंत व बालरंगभूमी शाखा पंढरपूर हे सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता करत आहेत

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.