नटराज भरतनाट्यम क्लासेस च्या मुलींनी जिंकली सोलापूरकरांची मने.


 सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या विर्द्यार्थिनिंनी जिंकली सोलापुरकरांची मने! 

पंढरपूर (प्रतिनिधी)

      सोलापूर येथील संस्कारभारती महानगर सोलापूर व सर्व शास्त्रीय नृत्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ,श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्णरंग हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सोलापूर येथील श्री शिवछत्रपती रंगभवन येथे संपन्न झाला.

यामध्ये पंढरीतील सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज नृत्त्य संस्थेच्या श्रीया बडवे , श्रीशा देशपांडे ,श्रुती कुलकर्णी ,  सृष्टी बजाज , श्रिया पाटील, श्रुती चौधरी, तनिषा कुसुरकर, रागिनी ठिगळे, ओवी कोठारी ,समृद्धी मामालाया  या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमात विविध गावातील ३० संघातून सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कलाविष्कारात सौ. जान्हवी पुजारी दुदगीकर, कु. श्रेया बडवे व कु. श्रीशा देशपांडे यांच्या विविध आदांवर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड दाद दिली. 

    या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील आचार्य शाहीर श्री हेमंतराजे पु. मावळे, व स्वाती दातार, सांगली येथील श्री. हेमंत मराठे, तर सोलापूर येथील उद्योजिका सौ. सुहासिनी शहा उपस्थित होत्या. 

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्री ईरेश स्वामी, श्री. श्रीकांत कुलकर्णी, श्री. अनंत देशपांडे, श्री. ऋषिकेश पागे तसेच सोलापूर येथील नृत्य निरंजन भरतनाट्य अकॅडमीच्या संचालिका सौ. जान्हवी पुजारी दुदगीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात यशस्वी सहभागी झाल्या बद्दल नटराज नृत्य अकॅडमीच्या संचालिका सौ. लक्ष्मी बडवे व विद्द्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.