स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सद्गुरू वेणाभारती यांचे मार्गदर्शन.


 स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथे कपिकुल सिद्धपीठ तर्फे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व  स्पिरिच्युएलिटी या विषयी मार्गदर्शन...

पंढरपूर (प्रतिनिधी)

श्री कपिकुल सिद्धपीठ नाशिकच्या पिठाधिश्वरी १००८ श्री सद्गुरु वेणाभारती महाराज व कपिकुलच्या उत्तराधिकारी कार्याध्यक्षा श्री कृष्णमयी तसेच कपिकुल मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर श्री पार्थ सर यांद्वारे स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यां करीता रोबोटिक्स तंत्रज्ञान व अध्यात्म याचे अतिशय सुंदर व्याख्यान स्वेरी कॉलेजच्या प्राचार्यांद्वारे आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी सर्वप्रथम सद्गुरूंचे, कृष्णमयी मॅडम व डायरेक्टर पार्थ सर यांचे कॉलेजच्या उपप्राचार्य व इतर शिक्षक यांद्वारे स्वागत करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन व कॉलेजतर्फे तिन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वेरी कॉलेजच्या विविध डिव्हिजनच्या सुमारे चारशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांनी कपिकुल मेकॅट्रॉनिक्स या रोबोटिक्स कंपनीचे उद्देश व सद्गुरु वेणा भारती महाराज यांचा अध्यात्मिक अधिकार साधना तसेच या आधुनिक क्षेत्रामधील अध्यात्मिक व तंत्रज्ञान याविषयीं चे गेली २५ वर्षे सुरू असलेले राम कार्य याबद्दल मार्गदर्शन केले... अध्यात्म साधना  हा कोणत्याही शिक्षणापूर्वीचा मानसिक व बौद्धिक पाया असायला हवा.. तसेच  पंढरपूर नगरी ही श्री पांडुरंगाची सिद्ध नगरी असल्यामुळे येथे शिक्षण मिळणे ही सौभाग्याची गोष्ट असून अशा आत्ताच्या जगामध्ये सर्वात उच्च असलेले रोबोटिक्स  तंत्रज्ञान त्या शिक्षणाची विद्यार्थ्यांना गरज आहे असे मत व्यक्त केले ज्याद्वारे आपण पंढरपुराचे नाव जगभरात आणखी प्रसिद्ध  करू शकतो असा विश्वास श्रीकृष्णमयी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला..

यानंतर आधुनिक संत चुडामणी गुरुदेव ज्या स्वतः देखील रोबोटिक्स तंत्रज्ञानातील कार्य करतात अशा सद्गुरु वेणाभारती महाराज यांनी अतिशय मोलाचे आध्यात्मिक मार्गदर्शन याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिले.. क्लोज युवर आईज म्हणजेच डोळे उघडण्यासाठी डोळे बंद करा असा मोलाचा उपदेश दिला.. एकाग्रता मानसिक शांती यश संपादन शक्ती यासाठी हनुमंतांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यापुढे ठेवावा असे सांगितले.. विज्ञान तंत्रज्ञान यास प्रथम अध्यात्मिक साधनेची जोड हवी तरच त्यातून विधायक असे कार्य भारताला उंची देण्यासाठी घडेल.. तसेच सूर्यनारायण हे जगातील पहिले शिक्षक आहेत त्यांच्याद्वारे, त्यांच्या किरणांद्वारे सर्व गोष्टी आपल्यापर्यंत आजवर पोहोचल्या आहेत..असे सद्गुरूंनी सांगितले म्हणून प्रत्येकाने रोज पहाटे उठून सूर्यनमस्कार व सूर्यास अर्घ्य देऊन साधना करून मग अभ्यास व दिवस सुरू करावा म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येईल असे मार्गदर्शन मुलांना दिले.

आजचे आधुनिक तंत्रज्ञान हे ज्या हातात आहे त्या व्यक्तीचे मन हे सशक्त व विवेकी असले पाहिजे, नाहीतर आजच्या एआयच्या जगात जर त्याचा वापर करणारा हा विवेकी सदविचारी नसेल तर हे तंत्रज्ञान व याचा वापर  चुकीच्या मार्गाने होऊन समाजात त्याचे विपरीत परिणाम होतील.. म्हणून यासाठी प्रत्येकाने अध्यात्मिक विचारांनी युक्त व शुद्ध विवेकी होऊनचं प्रत्येक तंत्रज्ञान वापरले गेले तरच समाजाचा भारताचा खरा विकास खरी उन्नती होऊ शकेल अशी जाग गुरूंनी दिली.

यानंतर रोबोटिक्स इंजिनियर श्री पार्थ सर यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले.. यामध्ये कपिकुल मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी तर्फे करण्यात आलेल्या विविध रोबोट च्या कार्यप्रणाली बद्दल सर्व विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केले, ज्या ज्या ठिकाणी मानवी हानी होऊ शकते.. मानवास  काम करण्यास अडचणी येऊ शकतात अशा अवघड कार्यासाठी रोबोट चा कसा वापर केला जाऊ शकतो तसेच आजवर सरांद्वारे व कंपनीद्वारे भारतभर आणि भारताबाहेरही  यशस्वीरित्या रोबोट द्वारे करत असलेल्या विविध प्रोजेक्टसचे प्रेझेंटेशन इथे प्रोजेक्टर वर दाखवण्यात आले.. कार बनवणाऱ्या कंपनी स्टील बनवणाऱ्या कंपनी यामध्ये सुरू असलेल्या रोबोट चे काम, रोबोटच्या कार्यप्रणालीचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना करून देण्यात आले आणि या सर्व अवघड तंत्रज्ञानामध्ये आपण भारतात राहूनच सद्गुरु कृपेमुळे हे ज्ञान कसे प्राप्त केले व आपल्या भारत भूमीसाठी येथील विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम यशस्वी करिअर म्हणून जॉब चि संधी म्हणून कसे उपयोगी येऊ शकते याविषयी त्यांनी सांगितले. श्री अर्जुनांना ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष रथावर युद्धामध्ये मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे पार्थ सर यांना सद्गुरु वेणाभारती महाराज यांचे वेळोवेळी प्रत्यक्ष रोबोटिक्स च्या अत्यंत अवघड अशा इन्स्टॉलेशनच्या बाबतीत स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन सदैव मिळत आले आहे आणि म्हणूनच आज भारतामध्ये राहूनच हे अवघड तंत्रज्ञान जे जर्मनी जपान येथे आज उपलब्ध आहे ते सहजरीत्या कपिल कंपनीतर्फे यशस्वीरित्या केले जात आहे  आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांना देखील या तंत्रज्ञानाचा त्यांच्या पुढील करिअरसाठी उपयोग व्हावा व इंजिनिअरिंग बरोबरच रोबोटिक्सचे ही ज्ञान मुलांनी प्राप्त केले तर त्यांना भविष्यात अत्यंत चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी पार्थ सरांनी सखोल मार्गदर्शन केले. 

यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांद्वारे प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला व कॉलेजतर्फे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आजवर रोबोटिक्स सारख्या अत्यंत अवघड विषयाची आम्हाला इतक्या डिटेल मध्ये तसेच प्रॅक्टिकली त्याचा कसा वापर होतो याविषयी कोणीही मार्गदर्शन आम्हास नव्हते व आजच्या या सेशनमुळे गुरु मार्गदर्शनाने साधना अभ्यासाने अध्यात्मात राहूनही तंत्रज्ञानात कसे उंचीवर जाता येते हे या कपिकुल मे केट्रॉनिकच्या सुरू असणाऱ्या कार्यामुळे आम्हाला समजले त्याचे फार कौतुक कॉलेज तर्फे करण्यात आले..आमच्या मनातील रोबोटिक्स तंत्रज्ञाना विषयीचे विविध शंका निरसन झाले असे विद्यार्थ्यांनी त्यांचे मतप्रदर्शन करून कपिकुल सिद्धपीठचे पार्थ सर गुरुदेवांचे व कृष्णमयी यांचे आभार मानले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.