भाळवणीच्या सरपंचपदी रणजित जाधव यांची निवड.
,भाळवणी च्या सरपंचपदी रणजित जाधव यांची निवड.
अटीतटीच्या लढतीत विजय.
प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील एक महत्वाचे गाव मोठी बाजारपेठ असलेल्या भाळ वणी चे सरपंच राजकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काळे गटाचे रणजित जाधव यांची बिनविरोध निवड होणे अपेक्षित होते. मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला.
शुक्रवार दी १९ रोजी शिवसेना(शिंदे गट)तालुका प्रमुख शिवाजी बाबर आणि सहकार शिरोमणी चे संचालक सुनील पाटील व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख विजय शिंदे यांनी चांगल्या विचारांच्या लोकांची मोट बांधून विजयश्री खेचून आणली.
व रणजित जाधव यांना सरपंच केले.
काळे गटाचे रणजित जाधव यांनी ९ विरुद्ध ८अशा फरकाने परिचारक गट, शिवसेना (ठाकरे गट), संभाजी शिंदे यांच्या गटाच्या सविता शिंदे यांचा पराभव केला
या विजयाने भाळवणीत नवीन पर्वाला सुरुवात झाली .
यामध्ये आर पी आय चे सचिन भोसले, धैर्य सिंह नाईक निंबाळकर, जयराम शिंदे अमोल लिंगे, भोजलिंग बाबर, किशोर खराडकर, यांनी विजय मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच निहाल शेख, सागर चौगुले, जावेद शेख , दीपक गवळी ग्राम पंचायत सदस्य जिगर गायकवाड, अर्जुन लिंगे, सविता लोखंडे, निवडी वेळी उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment