स्वामींची साथ असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही.- श्री दादा महाराज दामले.


 स्वामींची साथ असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही.-

श्री दादा महाराज दामले.

पंढरपूर (प्रतिनिधी)आयुष्याचा हा रस्ता खूप अवघड आहे,पण स्वामींची साथ आपल्या सोबत असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही फक्त कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका स्वामी सूक्ष्म रुपात अजूनही आहेत असे प्रतिपादन श्री दादा महाराज दामले यांनी केले.

पंढरपूर येथे श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ पुणे शाखेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री मोहन कुलकर्णी(मंगळवेढेकर) यांच्या बंगल्यात साजरा करण्यात आला.

यावेळी ते प्रबोधन करीत होते.

यावेळी व्यासपीठावर श्री मोहन कुलकर्णी, सौ रेखाताई कुलकर्णी, सौ ताई माऊली दामले उपस्थित होते.

पुढे बोलताना दादासाहेब दामले म्हणाले, अध्यात्मिक केंद्र सुरू करणे सोपे आहे पण ते सुरू ठेवण महत्वाचं आहे.

याबद्दल येथील सेवेकरांचे कौतुक वाटते.

अभिमान वाटावा अशी कामगिरी सौ रेखाताई व श्री मोहनराव यांनी केली आहे.कलियुगात तारक नाव हे स्वामींचे असणार आहे.

यावेळी त्यांनी श्री नृसिंह अवतार व त्याची आख्यायिका सांगितली.

 पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे देव मामलेदार यशवंत राव कुलकर्णी  यांना मिळालेली स्वामींची अनुभूती 

तसेच आरती मंडळाची स्थापना कशी झाली याची माहिती देऊन लॉक डाऊन काळात केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली.

मठाधिपती सौ रेखाताई कुलकर्णी यांनी पंढरपूर केंद्राच्या एक वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. 

दादा महाराज येणार म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्हांडनायक येणार हाच विचार होता,

येथील साधक गुरुवार कधी येतो याची वाट पाहत असतात.

दादांच्या प्रत्येक गोष्टीतून मार्गदर्शन मिळते.

सद्गुरू वाचुन आपले जीवन व्यर्थ आहे ते सोबत असतील तर कोणतीही वाईट शक्ती जवळ येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

समाजाला जे रुजते ते म्हणजे प्रबोधन यातून उद्बोधन घेता येते असे त्या म्हणाल्या.

श्री आनंद कुलकर्णी यांनी अयोध्या कार सेवेतील कै शंकर आप्पा मंगळवेढेकर जोशी व माधवराव जोशी यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी ची माहिती दिली.

७९ एवढे वय असतानाही शंकर आप्पा यांनी २२ फुटांची भिंत तीन धोतरे एकत्र बांधून पलीकडे उडी घेतली होती तर त्यांचे लहान बंधू माधवराव यांनी बाबरी ढाचा पाडला जात असताना श्री राम यांची मूर्ती सुरक्षित एका कपड्यात गुंडाळून तिचे रक्षण केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ यांची पालखी परदेशी नगर भागातून काढण्यात आली. यात ३०० सेवेकरी सहभागी झाले होते.

दिनेश हल्याळ, अनंत राव जोशी, सौ नंदिनी गायकवाड, सौ  माधवी खासनिस, स म पतकी, हेमा पतकी, सौ गौरी अंमळणेरकर, सौ मीना झांबरे, सौ  हर्षदा उत्पात, सौ अनुजा उंबरकर, सौ सुलभा रामदासी, सौ मृदुला उंबरकर, सौ निता कुलकर्णी, पारुल परमार, सौ शुभांगी देशमुख, सौ सीमा कुलकर्णी, श्रीमती जया कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.