श्री राम जन्मभूमी आंदोलनात कारावास भोगलेले प्रकाशदादा उत्पात.


 श्री राम मंदिर आंदोलनात कारावास भोगलेले प्रकाश दादा उत्पात.

पंढरपूर (प्रतिनिधी) श्री राम जन्मभूमी साठी प्रत्यक्ष कारावास भोगला ते लोहपुरुष कै प्रकाश पांडुरंग उत्पात उर्फ दादा यांना आज हे स्वप्न साकारत असलेले पाहून स्वर्गतही मोठा आनंद होत असेल.

प्रकाश दादा यांचे घराणे पक्के काँग्रेस पक्षाचे, त्याचे वडील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष होते, 

अनेक दिग्गज नेते घरी येत असत, ते काँग्रेस पक्षात असते तर सहज नगरसेवक आणि ईतर लाभ मिळाले असते,

त्यांच्या धाडसी स्वभावामुळे त्यांना १९८० साली शिवसेनेची ऑफर होती, तेव्हा शिवसेना शहर प्रमुखास एक अँब्युलन्स देत असत,पण हे केले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांशी ती प्रतारणा होईल म्हणून दादा कायम हिंदू महासभा या पक्षातच राहिले.

१९६५ साली ते म्हणायचे एक दिवस या देशात हिंदुत्ववादी लोकांचे सरकार येणार, तेव्हा लोक हसत.

सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी तमाम हिंदुत्ववादी लोकांचे स्वप्न साकार होणार आहे.

अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर साकारत आहे.

पण हे मंदिर व्हावे यासाठी जीवाची पर्वा न करता थेट अयोध्येपर्यंत धडक मारलेले पंढरपूर चे कै. प्रकाश पांडुरंग उत्पात यांचे योगदान आणि तळमळ विसरता कामा नये.

१९९० साली प्रकाश दादा उत्पात यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन या आंदोलनात उडी घेतली.

पंढरपूर येथील गौतम विद्यालयात एन डी एस, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असणारे प्रकाश दादा यांनी कुटुंबाचा कोणताही विचार न करता अगदी मृत्यू च्या दाढेत जायचं निर्णय घेतला.

१९९२ साली देशात राम मंदिरावरून अतिशय तंग वातावरण होते.

तरीही कारसेवेत ते गेले, सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यावर पंढरपूर येथे विक्रम सावरकर हे टिळक स्मारक मंदिर येथील अधिवेशनात आले होते तेव्हाच हिंदू महा सभेत सक्रिय प्रवेश घेत कार सेवेत जाण्याचा निर्णय घेतला, यावेळी दोनदा अतिशय भयानक संकटातून ते निभावून आले. उत्तर प्रदेश मधील प्रयाग येथे दोन वेळा लाठीमार आणि गोळीबार झाला.

पुढे सुमारे दीड महिना त्यांचा काहीच संपर्क नव्हता, त्या काळात आता सारखे मोबाईल स्मार्ट फोन किंवा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे कुटुंबियांच्या मनात सतत धाकधूक होती.

अनेक अडथळे होते पण कधी टांगा, ट्रॅक्टर,रेल्वे, ट्रक तर नावेमधून प्रवास करीत अयोध्या राममंदिर पर्यंत पोहोचले, यावेळी आंदोलन चिघळले होते, कधी काय होईल याचा नेम नव्हता,

यावेळी परिस्थिती बघून पंढरपूर येथील अनेक कार सेवक परत गेले, एकमेव प्रकाश दादा उत्पात यांनी श्री राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला, यावेळी पोलिसांनी अनेक हिंदुत्ववादी कार सेवकांसोबत प्रकाश दादा यांनाही कारावासात टाकले, पण या पोलिसांनाही कार सेवकांचा आदर होता, एक दिवस हिंदुत्ववादी लोकांचे सरकार येणार हे त्यांनाही ठाऊक होते, यामुळे खूप सन्मानाने वागणूक देत त्यांना सोडले, परतीच्या प्रवासात दादानी काशी विश्वनाथ तसेच मथुरेत जाऊन गोपालकृष्ण

दर्शन घेतले.

पंढरपूर येथे देखील तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्या सभेत दादानी दगडफेक करीत हिंदूविरोधी व्हि पी सिंग यांचा निषेध केला,

तत्कालीन डी एस पी पवार यांनी जहाल हिंदुत्ववादी दादा काहीतरी गडबड करतील याचा अंदाज आल्याने अगोदरच त्यांना अटक केली होती, पण दादा पोलिस ठाण्यातून पळून आले व सिंग यांच्या सभेवर हल्लाबोल केलाच असे धाडसी प्रकाश दादा उत्पात यांना आज श्री राम मंदिर निर्माण होत असल्याचे पाहून अत्यानंद झाला असता.

सध्या पंढरपूर शहरात ठिकठिकाणी अयोध्या राममंदिर उद्घाटन सोहळा अक्षता वाटल्या जात आहेत, परवा अक्षता कै. प्रकाश पांडुरंग उत्पात(दादा) यांच्याही घरी आल्यावर, त्यांच्या फोटो समोर अक्षता व निमंत्रण पत्रिका ठेवली, याक्षणी दादाना

स्वर्गातही धन्यता वाटली असेल यात शंका नाही.

निस्पृह आणि निस्वार्थी जीवन असणारे प्रकाश दादा यांच्या असीम त्यागामुळेच  आज त्यांचे कुटुंबीय एक आदर्श आणि यशस्वी जीवन जगत आहेत.

अशा समर्पित आयुष्य वेचलेल्या कै. प्रकाश दादा यांचे श्री राम मंदिर निर्मितीमधील योगदान अनमोल आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतीस लाखो प्रणाम.

जय राम श्रीराम जय जय राम.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.