केवळ स्वार्थ साधण्यासाठी विरोधक हे नगरपालिका निवडणूक लढवत आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक.,
केवळ स्वार्थ साधण्यासाठी विरोधक नगरपालिका निवडणुकीत आहेत, नगराध्यक्ष पद आरक्षित झाले असते तर फिरकले पण नसते._माजी आमदार प्रशांत परिचारक.
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक येथे भाजप आणि शहर विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दी २८नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली.
या प्रचारसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांच्या स्वार्थी तसेच जातीय राजकारणावर कठोर शब्दात टीका केली
यावेळी व्यासपीठावर प्रभाग क्रमांक १७मधील उमेदवार शंकर सूरवसे, गुरु दोडिया, संजय निंबाळकर, सुजित सर्वगौड आदी मान्यवर उपस्थित होते.
परिचारक म्हणाले परवा नगरपालिकेत गोंधळ घातला, प्राथमिक गोष्टी माहित नसल्याने गोची झाली आणि दोष इतरांना देण्यात येत होता, येथील नगराध्यक्ष पद ओ बी सी किंवा एस सी साठी आरक्षित झाले असते तर हे विरोधक पंढरपूर कडे फिरकले पण नसते, केवळ सर्वसामान्य महिला साठी पद गेल्याने स्वार्थ साधण्यासाठी न पा निवडणूक लढवत आहेत. एकदा निवडणूक झाली की पुन्हा नॉट रिचेबल, मिस्टर इंडिया होणार, आम्ही काय पैशासाठी राजकारण करत नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही.
१९३०साली आमच्या घरी कार होती आणि १९१०सालापासून आमचे घराणे राजकारणात आहे,
सूर्य काहीकाळ ढगाआड जातो पण तो तळपायाचे सोडत नाही. यांच्या घरात अकरा वर्षे आमदारकी होती एक तरी काम दाखवावे, मोठ्या मालकांनी विविध जाती वर्गातील लोकांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, आमच्या घरातील कोणीही नगराध्यक्ष नव्हते.
भविष्यात पंढरीत मोठ्या प्रमाणात भाविक येणार असून रस्ते,पार्किंग,पाणी, राहण्याची उत्तम व्यवस्था दिले पाहिजे.
सुदैवानं केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे हे सरकार चार वर्षे आहे.
यासाठी तीस पेक्षा जास्त नगरसेवक व आपल्या विचारांचा नगराध्यक्ष निवडून द्या असे आवाहन केले
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment