गोरगरीब जनतेचे कैवारी गंगेकर कुटुंब जनतेच्या भेटीला लोकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने भारावले गंगेकर कुटुंबीय.,


 गोरगरिबांचे कैवारी अक्षय गंगेकर आणि मातोश्री सौ राजश्री गंगेकर हे जनतेच्या भेटीला, लोकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने भारावले गंगेकर कुटुंबीय.

पंढरपूर ( प्रतिनिधी) गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचे कैवारी अशी ओळख असलेले नगरपालिका निवडणुकीत प्रथम पासूनच प्रचारात आघाडी घेतलेले अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी प्रचारफेरी काढून प्रभागातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन भेट घेतली.

त्यांचे आगमन होताच सर्व नागरिकांनी उस्फुर्त व मनापासून स्वागत केले.

अक्षय गंगेकर हे असे धाडसी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की दिल्या शब्दाला नेहमीच जागतात असा आजवरचा अनुभव लोकात आहे, कोणतेही, कसलेही काम असू द्या, एकदा गंगेकर कुटुंबीयांनी शब्द दिला म्हणजे ते होणारच, याच दिलदार वृत्तीने अनेक वर्षांपासून त्यांच्या घरातील लोक जनतेचे नेतृत्व करीत आहेत.

शेकडो घरात माता, भगिनी यांचे आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी आहेत.

त्यामुळे कीतीही मोठे आमिष विरोधकांनी दाखविले तरीही लोक त्यांच्यापासून कधीही दूर गेले नाहीत, संकटात सर्वात आधी धावून येणारे हे कुटुंब 

कोणताही विचार न करता जनतेच्या मदतीला धावून जातात, याची प्रचिती हजारो जनतेने घेतली आहे.

पंढरपूर शहरात त्यांच्या प्रभागात कधीच कोणती समस्या राहत नाही कारण सर्वसामान्य लोकांना त्यांनी आपले कुटुंब मानले आहे.

श्री अक्षय गंगेकर हे प्रभाग क्रमांक ब मध्ये तर मातोश्री सौ राजश्री गंगेकर या ३अ प्रभागातून निवडणूक लढवत आहेत.

राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घरातच असल्याने जनता जनार्दनाला एक विश्वास आहे गेल्या चाळीस वर्षांपासून हे कुटूंब जनसेवेत रममाण असून अक्षय यांचे वडील श्री प्रताप गंगेकर चाळीस वर्षांपासून कीतीही तगडे विरोधक समोर असूनही भरघोस मताने निवडून आले आहेत.

मोहोळ येथील आमदार श्री राजू खरे यांचा आशीर्वाद आणि राजकीय पाठबळ, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रणिता भालके यांची समर्थ साथ बरोबर आहे. माढ्याचे आमदार श्री अभिजीत पाटील हे देखील गंगेकर कुटुंबांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.

सौ प्रणिता भालके यांचा विजय आता निश्चित असून त्यांचाच नगरसेवक म्हणून अक्षय आणि सौ राजश्री गंगेकर हे निर्विवाद निवडून येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे, उत्तुंग यश मिळूनही गंगेकर कुटुंबाचे पाय नेहमी जमिनीवर असतात,

लोकात मिसळून समस्या जाणून घेण्याची आणि त्याचे निवारण करण्याची पद्धत हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.