नवनीत जनरल स्टोअर्स चे मालक विद्याधर आष्टीकर यांचे निधन.


 नवनीत जनरल स्टोअर्सचे मालक श्री. विद्याधर आष्टीकर यांचे निधन....


पंढरपूर... शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी तथा नवनीत जनरल स्टोअर्स चे मालक श्री. विद्याधर गौतमचंद आष्टीकर (रा. पंढरपूर) यांनी दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता प.पू.१०५ प्रज्ञामती माताजी यांच्या पवित्र सान्निध्यात यमसल्लेखना स्वीकारून शांतपणे देवाज्ञा प्राप्त केली.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच पंढरपूर परिसरात शोककळा पसरली असून व्यापारी, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आष्टीकर यांनी व्यापारी क्षेत्रात प्रामाणिकपणा व सेवाभाव जपत अनेक वर्षे कार्य केले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच सर्वांकडून प्रार्थना व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.