सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न.


 सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न.

पंढरपूर (प्रतिनिधी)स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी व्याख्यानमाला सावरकर प्रेमी मंडळ आणि सावरकर वाचनालय यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

          सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेली ही व्याख्यानमाला गेली ६० वर्ष त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि साहित्याचा प्रचार विविध व्याख्यानमालेच्या माध्यमातून करीत असते. यावर्षी मंगळवार दिनांक २४ ते गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी  दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

            सावरकर पुण्यतिथी व्याख्यानालाचे पहिले पुष्प पुण्याचे युवा व्याख्याते श्री मयूर भावे यांनी "महायोगी अरविंद" या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोहन मंगळवेढेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्या त्यांचा परिचय डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी करून दिला. व्याख्याते श्री मयूर भावे यांनी आपल्या  ओघवत्या शैलीत महायोगी अरविंद यांचे जीवनचरित्र सांगितले. योगी अरविंद यांच्या जीवनातील अनेक दिव्य प्रसंगाचे चित्र त्यांनी आपल्या व्याख्यानातून उभे केले. सुमारे एक तास दहा मिनिटे त्यांनी योगी अरविंद या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानाचा समारोप मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री शांताराम कुलकर्णी यांनी समयोच्चीतपणे केला.

 व्याख्यात्याचा सत्कार श्री.मोहन मंगळवेढेकर यांनी केला.

           सावरकर पुण्यतिथी 

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी  या दिवशी पुण्याच्या कुमारी श्वेता काजळे यांनी "प्राचीन   भारतीय विद्यापीठे" या विषयावर गुंफले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री मोहन मंगळवेढेकर हे होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी करून गेला कुमारी काजळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून भारतीय प्राचीन विद्यापीठांविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्राचीन  भारतीय विद्यापीठे ही जगाची ज्ञानकेंद्रे होती. जगभरातून अनेक लोक या विद्यापीठात शिकत असत. विद्यापीठातील शिक्षण पद्धती, प्रवेश प्रक्रिया अशा अनेक बाबीवर त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्रकाश पाडला. समारोपीय भाषण श्री तुकारामजी चिंचणीकर यांनी केले. त्यांनीही प्राचीन भारतीय विद्यापीठांचा आढावा घेतला.

             गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी सकाळी ठीक साडेआठ वाजता सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्ण कृती पुतळ्याची पूजन करण्यात आले यावेळी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी "जयोस्तुते" हे सावरकर गीत गाऊन स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकराच्या

 पूर्णकृती पुतळ्याचे पूजन मंडळाचे अध्यक्ष श्री मोहन मंगळवेकर, हिंदू सभेचे नेते अभय इचगावकर, सावरकर प्रेमी मंडळाचे सर्व संचालक, पंढरपूर शहरातील अनेक सावरकर भक्त, नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेवक सौरभ थिटे इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत पुतळा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संकेत कुलकर्णी यांनी केले.

           सायंकाळी सहा वाजता सावरकर क्रांती मंदिर पंढरपुरात प्राचार्य डॉ. श्री मिलिंद परिचारक यांचा "एक सर अनेक सूर" हा देशभक्तीपर सांगितिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अभ्यासकेसाठी आणलेले वातानुलुकलीत यंत्रांचे पूजन प्राचार्य श्री मिलिंद परिचारक व त्यांच्या सौभाग्यवती मीराताई परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सावरकर प्रेमी मंडळाचे हितचिंतक श्री स.धो.कुलकर्णी यांनी सावरकर प्रेमी मंडळ चालवीत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रातील श्री. तुषार मोरे या होतकरू विद्यार्थ्याला त्यांनी आर्थिक मदत दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीराताई परिचारक यांनी केले. प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी विविध सत्तावीस वाद्यांवर काही देशभक्तीपर गीत सादर केली.अनेक वाद्यावरचे त्यांचे प्रभुत्व रसिकांना पाहायला मिळाले.सुमारे दीड तास हा कर्णमधुर कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला. सोबतीला सौ. मीराताई परिचारक यांची सुंदर अशी निवेदन शैली ऐकायला मिळाली.कार्यकमाचा समारोप मंडळाचे संचालक श्री. शांताराम कुलकर्णी यांनी अतिशय समयोचितपणे केला.प्राचार्य डॉ. श्री. मिलिंद परिचारक आणि सौ. मीरा परिचारक यांचा सत्कार करण्यात आला.

             तीन दिवसीय सावरकर पुण्यतिथी व्याख्यानमालेस रसिक श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.