भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने शनिवारी दिव्यांग शिबिराचे आयोजन.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने शनिवारी मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन.
पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद शाखा पंढरपूर आणि दिव्यांग केंद्र पुणे यांच्या तर्फे तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे आणि कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या सहयोगाने मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन शनिवार दि.१४फेब्रुवारी रोजी सकाळी ९वा.
नवीन कराड नाका येथील डॉ काणे यांचे गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन आ.समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक, दिव्यांग केंद्र, पुणे चे विश्वस्त विनय खटावकर, आवताडे शुगर्स चे चेअरमन संजय आवताडे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्ष सौ स्मिता कोर्टीकर, डॉ वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, सौ माधुरी जोशी, मिलिंद वाघ, राजेंद्र केसकर, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, आर डी देशपांडे, अमित शिरगावकर, सौ भाग्यश्री लिहिणे, डॉ मृणाल गांधी,
सौ अनुराधा हरिदास, सौ मोनिका शहा, सौ रेखा टाक, विवेक परदेशी, भारत गदगे , दत्तात्रय तरळगट्टी व सर्व सदस्य हे
शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.
या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना हात व पाय बसविण्यासाठी मापे घेण्यात येणार आहेत.
एका हात, पायाची किंमत कमीत कमी ५०हजार रुपये आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा लाभ होऊन त्यांचे जगणे सुसह्य होणार आहे.
भारत विकास परिषद पंढरपूर शाखा ही समाजसेवा तसेच विविध सामाजिक ,सांस्कृतिक, साहित्यिक, लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करून
सातत्याने समाजाचे आपण काही देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन कार्य करत आहे,
तरी पंढरपूर व परिसरातील गरजू लोकांनी या मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment