पंढरपूर ते पापरी बससेवा सुरू करण्याची करण्याची ग्रामस्थांची मागणी.
पंढरपूर ते पापरी बस सेवेची ग्रामस्थांकडून मागणी
पंढरपूर प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातून पंढरपूरला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू असते यासाठी ग्रामस्थांनी बस सेवेची मागणी पंढरपूर आगर प्रमुखांकडे केली आहे
गावातील शैक्षणिक कारणास्तव विद्यार्थी तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शेतकरी वर्ग व भाविक भक्त हे रोज पंढरपूरकडे ये जा करत असतात परंतु एसटीची गावातून सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे प्रामुख्याने गावातील शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते यासाठी गावातील तरुण वर्गाच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या मागणी पत्रासह ग्रामस्थांच्या सह्यांचे पत्र पंढरपूर आगार प्रमुखांकडे बस सेवा सुरू करण्याबाबत दिले आहे लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे यावेळी आगार प्रमुखांनी सांगितले यावेळी छावा छात्रविर सेनेचे विजय कदम तसेच उद्योजक आशुतोष सुतार उपस्थित होते बस सेवा सुरू झाल्यास ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांची ये जा करण्यासाठी सुरक्षित सोय होणार आहे
फोटो ओळ
आगार प्रमुखांना मागणी पत्र देताना तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी अतुल फराटे

Comments
Post a Comment