डॉ शीतल शहा यांच्या फस्ट क्राय या लहान मुलांच्या कपड्यांच्या दालनाचे उद्घाटन.
पंढरीत डॉ. शितल शहा यांच्या
फर्स्ट क्राय लहान मुलांच्या कपड्यांच्या दालनाचा शुभारंभ
रविवारी डॉ. शितल शहा कुटुंबीयांच्या हस्ते झाला शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांसाठी कपड्यांचे शोरूम उभे केले आहे.
या दालनाचा शुभारंभ डॉ. शितल शहा पत्नी सौ. सुषमा शितल शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी सुदीप शितल शहा आणि सांत्वना सुदीप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या शुभारंभ सोहळ्यास आ. समाधान आवताडे, अमर पाटील आणि प्रणव परिचारक यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
पंढरपूर शहरात लहान मुलांची कपडे घ्यावयास गेल्यास,अनेक दुकाने पालथी घालावी लागतात. पंढरीतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शितल शहा यांनी लहान मुलांच्या कपड्यांचे दालन उभारून
या मुलांच्या कपड्यांसाठी नागरिकांना सुविधा निर्माण करून दिली आहे. शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज समोरील
विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुलात हे शोरूम साकारण्यात आले आहे. जन्मलेल्या लहान बालकांपासून सुमारे २० वर्षापर्यंतच्या मुलांना या ठिकाणी कपडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशा प्रकारचे पंढरपूर शहरात प्रथमच शोरूम उभारण्यात आले असून, डॉ.शीतल शहा यांनी एका वेगळ्या उद्योगात प्रवेश केल्याचे पहावयास मिळाले आहे.
रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी
सायंकाळी ५ वाजता या भव्य दालनाचा शुभारंभ डॉ. शितल शहा दांपत्याच्या शुभ हस्ते करण्यात आला. या दालनास रविवारी आमदार समाधान अवताडे , नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके,युवक नेते प्रणव परिचारक, आ. अभिजीत पाटील यांचे बंधू अमर पाटील यांच्यासह पंढरपूर शहरातील अनेक नामवंत मंडळींनी भेट दिली.
चौकट
पंढरीतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांसाठी पंढरपूर शहरात फर्स्ट क्राय हे कपड्यांचे दालन उभारले आहे. रविवारी या दालनाचा शुभारंभ डॉ. शितल शहा दांपत्याने केला. यावेळी सुदीप शितल शहा, सांत्वना सुदीप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. पंढरपूर शहरातील केबीपी कॉलेज समोरील विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या या दालनास आ.समाधान अवताडे,अमर पाटील, प्रणव परिचारक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment