साहित्य परिषदेसारख्या निवडणुकात राजकारण आणू नये._योगेश सोमण.


 साहित्य परिषदेसारख्या निवडणुकात राजकारण आणू नये,_योगेश सोमण,

 पंढरपूर (प्रतिनिधी)_सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक योगेश सोमण हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उभे आहेत, साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकारण आणू नये असे मत योगेश सोमण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक योगेश सोमण आणि प्रा.मिलिंद जोशी यांच्यात अध्यक्ष पदासाठी सरळ लढत होणार आहे.

प्रमुख कार्यवाह पदासाठी प्रकाशक  सुनीताराजे पवार आणि सुप्रसिद्ध निवेदिका स्वाती महाळंक यांच्यात लढत होणार आहे, कोषाध्यक्ष पदासाठी विनोद कुलकर्णी, विनायक आंबेकर, आणि प्रदीप निफाडकर यांच्यात लढत होणार आहे.

योगेश सोमण हे आज पंढरपूर येथे आले असता त्यांच्याशी साधलेला संवाद,

योगेश सोमण हे पुणे येथील असून महाविद्यालयी  पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेतून साहित्य व रंगभूमी या क्षेत्रात आले आहेत, ते सध्या मुंबई विद्यापीठ अकॅडमी ऑफ आर्ट्स, या विभागात कार्यरत असून, पुणे येथे स्नेह ही नाट्यसंस्था गेल्या ३८वर्षांपासून चालवीत आहेत, त्यांनी ७६एकांकिका लिहिल्या आहेत, पाच चित्रपट कथा, ११नाटके लिहिली आहेत दृश्यम , १आणि २, उरी द सर्जिकल स्ट्राईक, या सिनेमात, नांदा सौख्य भरे, क्राइम पेट्रोल या मालिकेत भूमिका साकारली असून मी विनायक दामोदर सावरकर, आनंदडोह असे एकपात्री प्रयोग करतात.

साहित्य परिषदेच्या निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले सुमारे १०वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे, याआधी २०१६साली निवडणूक झाली, पुढे २०२१मध्ये कोरोना मुळे निवडणूक झाली नाही,कार्यकारिणीला दोन वर्षे मुदतवाढ मिळाली, साहित्य संवर्धन आघाडी यांच्या वतीने आम्ही निवडणूक लढवित आहोत, आमची भूमिका लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे केवळ विरोध करण्यासाठी नाही, आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात आमची भूमिका मांडली आहे साहित्य परिषदेच्या कामात प्रचंड गोंधळ दिसत आहे कित्येकांना आपण आजीव सभासद आहोत हे माहिती नाही, परिषदेच्या टिळक रोड येथील कार्यालयात पारदर्शक कारभार नाही, कामाची पद्धत, विचार कळत नाहीत, अनेक कार्यक्रमांचे निरोप, माहिती मिळत नाही. साहित्य परिषदेच्या कार्यात लोकाभिमुखता पाहिजे, पुनरुज्जीवन केले पाहिजे, बहुसंख्य वाचक आहेत, सगळ्या शाखा सक्षम झाल्या पाहिजेत.

प्रत्येक तालुक्यात ३साहित्यिकांची नेमणूक करून परिसंवाद घेतले पाहिजेत, मसाप शाखेचा वर्धापन दीन साजरा करण्यात आला पाहिजे, तालुका स्तरावर तसेच ग्रामीण भागातील वाचनालयास भेटी द्यायला हव्यात, विविध उपक्रमांनी कार्यरत असायला हवे ,मात्र सध्याचे पदाधिकारी स्वतःचा एक कंपू निर्माण करून दरवेळी अंधारात ठेवत आहेत.

साहित्य परिषदेसारख्या ठिकाणी राजकारण असू नये, साहित्य परिषद ही राजकारण,सत्ताकारणापासून दूर असली पाहिजे,

वाचनालयास देणगी स्वरूपात पुस्तके दिली पाहिजेत,

याउलट परिषदेचा कारभार दिसत असून जनरल मीटिंग मध्ये दादागिरी,धमकावणे, हमरीतुमरीवर येऊन मोठ्या आवाजात बोलणे, आर्थिक भ्रष्टाचार असे अनेक गैर प्रकार सुरू आहेत,

महाराष्ट्र साहित्य परिषदेला १०७वर्षांचा ईतिहास आहे त्याचे डिजिटायझेशन झाले पाहिजे, परिषदेच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे, साहित्य पत्रिका, कथा स्पर्धा, काव्य स्पर्धांची माहिती सदस्य,पदाधिकाऱ्यांना झाली पाहिजे, हा साहित्याचा प्रवाह आहे नवनिर्मिती झाली पाहिजे,

पुस्तक महोत्सव, विभागीय साहित्य संमेलन तीन ठिकाणी झाली पाहिजेत,

काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पुस्तक महोत्सव मध्ये लाखो दर्जेदार पुस्तकांची विक्री झाली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

आता १००वे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचक संस्कृती फोफावली पाहिजे, आजीव सभासदांना मतदान करता येते, मतपत्रिका पुण्यातून पाठविल्या जाणार आहेत. रजिस्टर किंवा स्पीड पोस्ट ने येतील, दोन पाकिटे असतील, तीन मते देता येणार असून त्यापेक्षा जास्त मत दिल्यास मतपत्रिका बाद ठरवण्यात येईल, सेल्फ अटेस्टेड करून स्वखर्चाने पोस्टेज करून शुक्रवार दि.१३मार्च पर्यंत मतपत्रिका पाठवाव्यात रविवार दि.१५मार्च रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.