पंढरपूर शहरात दी२२जून रोजी महा स्वच्छता मोहीम, ४२ठिकाणी होणार स्वच्छता मोहीम.
पंढरपूर शहरात 22 जून रोजी महास्वच्छता अभियान
स्वच्छतेसाठी शहरातील 42 ठिकाणे निश्चित
पंढरपूर दि.(20) :- आषाढी यात्रेच्या अनुषंगाने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदशनाखाली पंढरपूर शहरात आषाढी पूर्वतयारी म्हणून महास्वच्छता अभियान सकाळी ७ ते १० या कालावधीत राबवले जाणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
सदर महास्वच्छता अभियान सकाळी 7 ते 10 या कालावधीत राबवले जाणार असून त्याकरिता पंढरपूर शहरातील 42 ठिकाण निश्चित करण्यात आली आहे. महास्वच्छता अभियाना करीता नेमून दिलेल्या ठिकाणी पथकांनी सकाळी 7. 00 ते 10. 00 वेळेत आपले काम पूर्ण करायचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या अभियानाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment