चिंचोली भोसे येथे वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोठी कारवाई, तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी.
तालुका पोलीस व महसूल ची संयुक्त कारवाई, चिंचोली भोसे येथे वाळू तस्करांच्या होड्या जाळून
मोडले कंबरडे.
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत चिंचोली भोसे नदी काठावर वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोठी कोंडी केली.
मंगळवार दि. १० जून रोजी माननीय उपविभागीय अधिकारी सचिन इथापे , उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा नदी पात्रात मौजे चिंचोली भोसे या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे व महसूल प्रशासनाचे संयुक्त कारवाईत भीमा नदी पात्रातील बोटी कापून जाळून नष्ट करण्यात आल्या.
मागील काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी सर्वत्र धुमाकूळ माजवून भीमा नदीचे पात्र पोखरले आहे,
पंढरपूर येथे नदीत मोठमोठे खड्डे पडल्याने एकाच महिन्यात चार भाविकांचा
पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वाळू चोरीने गबरगंड झालेले माफिया कुणालाच जुमानत नाहीत अनेकदा शासकिय अधिकाऱ्यांच्या
अंगावरच वाहने घालण्याचे प्रकार घडले आहेत,
या मोठ्या कारवाईने मुजोर झालेल्या वाळू माफियांवर पोलीस व महसूल प्रशासनाने चांगलीच जरब बसविली आहे, शहर व तालुक्यातून या कारवाईची चर्चा सुरू असून अशा प्रकारच्या कारवाया होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक
टी वाय मुजावर यांच्या धडाकेबाज कामगिरीने
जनतेत त्यांच्याबद्दल आदर्श आणि विश्वास निर्माण होत आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment