सद्गुरू श्री बेलापूरकर महाराज यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्याचे वाटप.


 श्री सद्गुरू बेलापूरकर महाराज संस्थान पंढरपूर तर्फे शालेय  साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न .

पंढरपूर ( प्रतिनिधी)

 श्री सद्गुरु बेलापूरकर महाराज संस्थान पंढरपूर त्यांच्यातर्फे आर्थिक दृष्ट्या मागास, अनाथ तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम बेलापूरकर महाराज मठामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुंडा महाराज संस्थान चे उत्तराधिकारी हरिभक्त परायण चक्रीनाथ महाराज सिद्धरस तर प्रमुख पाहुणे श्री. प्रणव परिचारक हे होते कार्यक्रम हरिभक्त परायण श्रीकांत महाराज हरिदास तसेच पंढरपुरातील प्रमुख उद्योजक श्रीराम बडवे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना स्वरज्ञ महाराज बेलापूरकर यांनी केली. त्यांनी संस्थानाचे माध्यमातून साजऱ्या  केल्या जाणाऱ्या अनेक  उपक्रमांची माहिती दिली, त्याचप्रमाणे गतवर्षी हा कार्यक्रम कोणत्या पद्धतीने साजरा करण्यात आला हे  उपस्थितांना सांगितले. त्यानंतर श्रीराम बडवे यांनी पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून कार्याला शुभाशीर्वाद दिले. हरिभक्त परायण श्रीकांत महाराज हरीदास यांनी श्री पांडुरंग महाराजांचे आशीर्वाद देऊन संस्थानाच्या माध्यमातून उत्तम काम होत आहे ते सांगितले. श्री. प्रणव परिचारक यांनी आपली मत मांडताना अशा उपक्रमांची खरोखर गरज आहे आणि अशा उपक्रमाला आम्ही नेहमी सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये चक्रीनाथ महाराज यांनी मुलांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे शालेय साहित्याचा योग्य वापर व्हावा आणि त्या माध्यमातून उत्तम गुण प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर श्री. सागर महाराज बेलापूरकर यांनी संस्थानाच्या वतीने सर्वांचे आभार मानले आणि सर्वांच्या सदिच्छामुळेच हा कार्यक्रम पार पडत आहे असे स्वतःचे मत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित एकूण ८७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये A४ पेपर साइज किंवा लहान येतेनुसार सहा वह्या पाच पेन किंवा पेन्सिल पाऊच खोड रबर टोकरणी सॅग असे शालेय साहित्य होते. या कार्यक्रमाला माजी वैद्यकीय अधिकारी, आदर्श शाळेचे संचालक डॉक्टर अनिल जोशी तसेच  ओंकार जोशी वकील यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वस्ति बेलापूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.