भारत विकास परिषदचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न सौ रोहिणी कोर्टीकर यांची नूतन अध्यक्षपदी निवड..
पंढरपूर येथे भारत विकास परिषदेचा पदग्रहण उत्साहात सोहळा संपन्न.
सौ रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची अध्यक्षपदी निवड.
पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद या सेवाभावी संस्थेच्या वतीने शनिवार दि.१४जून रोजी दायित्व ग्रहण सोहळ्याचे (शपथविधी)आयोजन केबीपी चौक येथील हॉटेल राधेश येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी, सौ सुनेत्रा मंकणी , पश्चिम महाराष्ट्र प्रांत महासचिव शिरीष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे रवींद्र मंकणी म्हणाले, पंढरपूर सारख्या अध्यात्मिक शहरात भारत विकास परिषद आपल्या विविध कार्यक्रमांनी समाजसेवे बरोबरच उच्च दर्जाचे संस्कार विद्यार्थ्यांना
देत आहे, येथे येऊन खूप आनंद झाला.
नूतन अध्यक्ष सौ रोहिणी कोर्टीकर यांनी निवडीबद्दल ऋण व्यक्त करीत आपण घेतलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडू अशी ग्वाही दिली.
संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी, पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
नूतन अध्यक्ष म्हणून सौ. रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची निवड करण्यात आली तर नूतन सचिव मंदार केसकर यांची निवड करण्यात आली.
कोषाध्यक्ष सुनील परळीकर, उपाध्यक्ष महावीर गांधी, सहसचिव मोनिका गांधी, सह कोषाध्यक्ष सौ रेखा टाक,
संघटक मिलिंद वाघ, सीमा कुलकर्णी, भारत गदगे , दत्तात्रय तरळगट्टी यांची गुरुवंदन प्रमुख म्हणुन निवड करण्यात आली .
डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, सौ अनुराधा हरिदास यांची नूतन सेवाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
महिला संघटक पदी सौ भाग्यश्री लिहिणे यांची निवड करण्यात आली.
अमित शिरगावकर, आर डी देशपांडे, स्वाती जोशी यांची भारत को जानो , स्पर्धाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
सौ माधुरी जोशी, सौ स्वानंदी काणे, सौ शिल्पा चौंडावार यांची समूहगान स्पर्धा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
पर्यावरण- विवेक परदेशी, राजेंद्र केसकर, नीलम माळी यांची निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष पत्रकार मंदार लोहोकरे यांनी माजी अध्यक्ष मनोगत व मागील वर्षी केलेल्या कार्याचा अहवाल माजी सचिव डॉ. अनिल पवार यांनी सादर केला.
सदस्य म्हणून पत्रकार चैतन्य उत्पात, मनोज कुलकर्णी, ऐतवाडकर, सुरेखा कुलकर्णी, सुचिता भादुले, वैजयंती कुलकर्णी, मकरंद रत्नपारखी, प्रीती वाघ, बारसोडे मॅडम, अजीज भायाणि यांची निवड करण्यात आली.
सौ. सीमा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत व सौ. मोनिका शहा यांनी प्रास्ताविक केले.
मान्यवर पाहुण्यांचा परिचय सौ. यादगिरी मॅडम, सौ. माधुरी जोशी, डॉ. सौ. वर्षा काणे यांनी केला.
यावेळी पंढरपूर येथील रोटरी क्लब, लायन्स क्लब, विद्या विकास मंडळ
पदाधिकारी, कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. मैत्रेयी केसकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपादक.
चैतन्य उत्पात.


 
 
 
Comments
Post a Comment