कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरी कलारत्न पुरस्कार जाहीर. पंढरपूर आजोळ असलेल्या क्षितिजा ताशी यांना पंढरी कलारत्न पुरस्कार देण्यात येणार.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर.
पंढरपूर- (प्रतिनिधी)
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे. अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १७ वर्ष हा पुरस्कार देत असतो. पंढरी कलारत्न हा पुरस्कार यावर्षी पंढरीच्या पौत्रा व सध्या कोल्हापूरस्थित असलेली कु. क्षितिजा ताशी यांना प्रदान केला जाणार आहे. स्वा. सावरकरांच्या जीवनावर १९फूट जाडीच्या पुस्तकात त्यांनी आर्टीकल लिहिल्याने त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे. तसेच व मुंबई आकाशवाणीवर उत्कृष्ट निवेदिका म्हणून गौरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती विद्यार्थीनी म्हणून राष्ट्रपती सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
सध्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. त्या आधी मुंबई येथील नामांकित महाविद्यालयात अध्यापन केले आहे. Professional Anchor, writer, influencer, motivational speaker आहे. भारता मध्ये झालेल्या G 20 मध्ये शोधनिबंध सादर केला आहे.
संशोधन क्षेत्रात ५ वर्षापेक्षा जास्त काळ काम करत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधनपत्रात शोधनिबंध प्रसिध्द, तसेच चर्चासत्रात शोधनिबंध सादर केले आहे. भाषाशास्त्र, साहित्य, भाषासंप्रेषण, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास हे काही विशेष अभ्यासाचे विषय. अनेक नामवंत महाविद्यालयात, संस्थांमध्ये, साहित्यसंमेलनात व्याख्याने झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलेले पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. संतसाहित्य व अध्यात्म हा देखील अभ्यासाचा विषय आहे. मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ संलग्न अनेक महाविद्यालयात, स्पर्धामध्ये, युवक महोत्सवात परिक्षणाचे काम केले आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागात इंग्रजी भाषा संप्रेषण व संभाषण कौशल्य या विषयासाठी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. व्यावसायिक निवेदनाचे काम गेली १२ वर्षे करत आहेत . अनेक मोठया स्तरावर आयोजित केलेल्या साहित्यिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुत्रसंचालनाचे काम केले आहे. आकाशवाणी मुंबई आणि कोल्हापूर येथे निवेदक म्हणून काम केले आहे. राष्ट्रपती सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. साधना पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. महाराष्ट्र टाईम्स या प्रसिद्ध वृत्तपत्रात एक वर्ष स्तंभलेखन केले आहे. चित्रकलेची विशेष आवड आहे. सध्या भारतीय प्राचीन चित्रकलांचे प्रकार यावर एक चित्रशृंखला बनवली आहे. वादविवाद, वक्तृत्व राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विशेष यश प्राप्त. काठमांडू विद्यापीठ, नेपाळ इथे साऊथ एशियन इंटरनॅशनल काॅन्फरन्स मध्ये Panelist म्हणुन सहभागी तसेच तेथे पेपर प्रेझेन्टेशन केले आणि बेस्ट पेपर प्रेझेन्टेशन चे अॅवाॅर्ड मिळवले. क्वाला लंपुर,मलेशिया येथील University of Technology, MARA येथे संपन्न झालेल्या International Conference मध्ये Session Chair म्हणून आमंत्रित. त्यात सादर केलेल्या शोधनिबंधास विशेष पुरस्कार. आज पर्यंत केलेल्या संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल International young achiever award २०२३ देऊन गौरव. क्षितिजा ताशी यांनी गिनीज जागतिक विक्रम केल्या मुळे गिनीज कडून त्यांना गौरविण्यात आले आहे. १९ फुटाचे आणि एक लाख पाने असणार्या ESN प्रकाशन प्रकाशित संशोधनातील आधुनिक प्रचलित पद्धती या पुस्तकात एक प्रकरण लिहिले आहे.
ईस्टर्न विश्वविद्यालय श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला आणि तेथे बेस्ट researcher अवॉर्ड प्राप्त झाले. United Nations ch Global Changemaker Award मिळाले आहे. Mumbai येथे ३० March २०२४ मध्ये Ideal Teacher Award मिळाले.
सध्या काम करत असलेल्या महाविद्यालयात अनेक committee च्या प्रमुख म्हणुन काम करत leadership चे नवीन आयाम प्राप्त केले. अभिग्यान या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करून त्यात स्पृहा जोशी, IPS वैभव निंबाळकर, MAB Aviation che owner Mandar Bharde, CA Rachana Ranade, Alexa cha inventor Dhairya Dand actor Hrishikesh Joshi इत्यादी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. या परिषदेत जगभरातील २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि १०० विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची टीम प्राध्यापक ताशी यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. ही परिषद अत्यंत यशस्वी झाली. याबरोबरच अत्यंत बिकट परिस्थितीतून वैद्यकीय क्षेत्रात मानाचे असणारे एम डी मेडिसीन मधील कार्डिऑलॉजिमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेले डॉ. बसवराज ब्रम्हानंद सुतार, ऐतिहासिक व अत्यंत खडतर असणा-या मलेशिया मध्ये घेतल्या जाणाऱ्या कॉम्रेड या ऐतिहासिक स्पर्धेत यशस्वी सहभागी होऊन ती स्पर्धा जिंकणा-या श्री.बलभीम ढोबळे व मुसाक काझी तसेच योग शास्त्रात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदके कमावलेली कु अमृता सलगिरे हीला, आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या़ यश चव्हाण, तर नुकत्याच झालेल्या बी. ए. एल. एल.बी.परिक्षेत सुवर्णपदक प्राप्त झालेल्या कु. प्रार्थना अतुल शेटे व संगीताच्या सेवे बद्दल बाळासाहेब परिचारक यांना विशेष गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम पांडुरंग भवन येथे सोमवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ५वाजता मा आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे यांच्या अध्यक्षतेखाली व सिंहगड इंजि. कॉलेजचे प्राचार्य श्री. कैलास करांडे सर, विठ्ठलदास अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध बडवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, सचिव ज्ञानेश्वर मोरे, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, जगदीश खडके, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार,प्रा. मंदार परिचारक,महेश अंबिके, भिमराव औसेकर, विष्णुकांत बोंबलेकर , अमृतभाई शहा, डॉ. किरण बहीरवाडे, अनंता नाईकनवरे,अशोक अवताडे सर, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे, डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, सौ. आरती बोरखेडकर, सौ. वैष्णवी देशपांडे, सौ. गौरी देशपांडे, शिवाजी यादव आदी कलासाधनाचे सदस्य विशेष प्रयत्नशील आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment