कौठाळी पुलावर मासेमारी करणाऱ्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यु.


 कौठाळी पुलावर मासेमारी करणाऱ्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यु.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_भीमा नदीच्या पुलावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा कठड्यावरून तोल जाऊन पात्रात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला.

पंढरपूर नजीक असणाऱ्या कौठाळी पुलावर रविवार दि.२३फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता ही दुर्देवी घटना घडली.

पंढरपूर येथील संत पेठ भागातील भाई भाई चौकातील भारत मुरलीधर होटकर (वय,५२) हे मासे पकडण्यासाठी रविवारी होळे , कौठाळी पुलावर पाण्यात गळ टाकून मासेमारी करीत असताना पाय घसरून अरुंद पुलावरून भीमा नदीच्या पात्रात पडले,

होटकर हे विवाहीत होते, पत्नी आणि दोन मुले असा परिवार होता, सायंकाळी त्यांच्या दुर्देवी मृत्यूची बातमी समजताच भाई भाई चौकातील घरात मित्रमंडळी, नातेवाईक यांनी गर्दी केली होती.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.