पंढरपूर तालुका पोलीसांनी ४२दुचाकी मूळ मालकांना केल्या सुपूर्द.


 पंढरपूर तालुका पोलीसांनी ४२दुचाकी मुळ मालकांना केल्या सुपूर्द.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर तालुका पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून पुण्यातील व बेवारस अशा एकूण ४२ मोटर सायकलची मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील एक महिन्यापासून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे जप्त असलेले पुण्यातील व बेवारस मोटरसायकल मालकांचा शोध घेऊन सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील असलेल्या मोटरसायकल मालकांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बोलावून एकूण ४२ मोटरसायकली संबंधित मोटरसायकल मालकाच्या ताब्यामध्ये सुपूर्तनामवर बॉण्ड घेऊन देण्यात आलेले आहे सदरच्या मोटरसायकली मागील अनेक वर्षांपासून तालुका पोलीस स्टेशन येथे पडून होत्या याबाबत पाठपुरावा करून संबंधित मोटरसायकल मालकाचा सोलापूर जिल्ह्यात व जिल्हा बाहेर आरटीओ कार्यालयाकडून शोध घेऊन सविस्तर माहिती तयार करून एकूण ४२ मोटरसायकली संबंधित मोटरसायकल मालकाच्या ताब्यामध्ये सुपूर्द नावे देण्यात आलेले आहेत .

सदरची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी  अर्जुन भोसले  यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षण टी वाय मुजावर, एएसआय मनरे मॅडम स्वप्निल वाडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी ,  खेडकर  , नदाफ ,चाटे यांच्या पथकाने केली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.