छावा चित्रपट करमुक्त करण्याची भाजप पक्षाच्या वतीने डॉ प्राजक्ता बेणारे यांची मागणी.
छावा, चित्रपट करमुक्त करण्याची भाजप च्या वतीने मागणी.
प्रतिनिधी पंढरपूर _सध्या संपुर्ण भारतात राजे छत्रपती संभाजी महाराज
यांची जाज्वल्य व प्रेरक इतिहास असलेल्या छावा या हिंदी चित्रपटाची चर्चा आहे. हा सिनेमा सर्वांना पाहता यावा यासाठी करमुक्त करण्याची मागणी पंढरपूर भाजप यांच्या वतीने महिला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे.
महाराष्ट्रात देखील रामचंद्र उत्तेकर दिग्दर्शित, छावा चित्रपटाची संपूर्ण चर्चा सुरू आहे ,
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान वारसा आहे
हा इतिहास प्रत्येक घरामध्ये पोहोचणं आवश्यक आहे
या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक घरात तो पोचतोय
परंतु सोलापूर जिल्हा ग्रामीण असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी देखील हा चित्रपट पहावा अशी इच्छा आहे
तरी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या करता आणि मुलींच्या करता हा चित्रपट मोफत दाखवावा अशी विनंती आहे
हिंदू हिंदवी स्वराज्य आणि धर्माकरता बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई या महाराजांच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कैद असताना त्या ठिकाणी महाराणी येसूबाई यांनी कन्या रत्नाला जन्म दिला
महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाई यांनी देखील अतिशय संघर्ष आणि विजनवास आपल्या पतीसाठी पत्करला
या गोष्टीचे स्मरण ठेवून
"महाराणी येसूबाई स्मरण सप्ताह"या अंतर्गत
सर्व ग्रामीण भागातील महिलांना हा चित्रपट विनाशुल्क दाखवावा अशी माझी विनंती आहे
त्याचबरोबर आणखीन एक विनंती आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्यांनी केलं आहे ते रामचंद्र उतेकर त्यांना महाराष्ट्र शासनाने विशेष गौरवाने सन्मानित करावं
तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल यांनी अतिशय सुंदर अशी पार पाडलेली आहे त्यांनाही सन्मानित करावं
त्याचबरोबर औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये अक्षय खन्ना यांनी देखील अतिशय उत्तम काम केलेला आहे
वास्तविक त्यांनी जरी औरंगजेबाची भूमिका केलेली असली तरी औरंगजेब ही वृत्ती आहे आणि अक्षय खांना हे अभिनेते आहेत परंतु
त्यांचं काम अतिशय सुरेख वाखणण्याजोग झालेला आहे
त्यांचाही गौरव व्हावा अशी मागणी आहे
या संदर्भात योग्य ते आदेश प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला देऊन ग्रामीण भागातील महिलांच्या साठी या चित्रपटाचा शो निशुल्क आयोजित करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
चौकट.
पंढरपूर येथे छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ज्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे, त्या शिवाजी सावंत लिखित छावा ही ऐतिहासिक कादंबरी घेण्यासाठी शहरातील वाचनालयात,
पुस्तकांच्या दुकानात युवक
विचारणा करीत आहेत,
स्टोरी टेल या ऍप वर हे पुस्तक वाचण्यासाठी युवा पिढी सर्च करत आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment