खर्डी गावाजवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड, एक लाख ७५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
*खर्डी येथील जुगार अड्ड्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई
एकूण १५७००० हजार रुपये रोख रक्कम व १८ हजार रुपयाची अवैध दारू असा एकूण एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पंढरपूर (प्रतिनीधी)
पंढरपूर सांगोला रोडवरील खर्डी या ठिकाणी पप्पू अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे अवैध जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्याने धाड टाकून कारवाई करण्यात आली.
शनिवार दि ५रोजी अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक , प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आयपीएस मॅडम श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले पीएसआय विक्रम वडणे पीएसआय पाटील पीएसआय संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हवालदार मंगेश रोकडे दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे पोलीस कॉन्स्टेबल तात्या गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने खर्डी येथील अभंगराव यांच्या हॉटेलच्या मागे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धाड टाकली असता एकूण वीस आरोपी अवैधरित्या पैशावर जुगार खेळत असताना मिळून आल्याने सदर जुगार अड्ड्यावर जुगार खेळत असताना एकूण १५७००० रोख रक्कम मिळून आल्याने पंचाच्या समक्ष पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली आहे. तसेच सदर ठिकाणी झेडती घेतली असता अवैधरित्या बाळगलेली एकूण १८ हजार रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आल्याने एकूण एक लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला असून अवैध जुगार अड्डा चालवणारा इसम पप्पू अभंगराव व इतर १९ जणांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्रजुगार अधिनियम कलम ४आणी ५व मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले आयपीएस श्रीमती अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय, भारत भोसले ,पीएसआय विक्रम वाढणे पीएसआय पाटील, पीएसआय संजय राऊत चंद्रकांत पाटील, दत्तात्रय तोंडले सपोनि विजू गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी , मंगेश रोकडे , विनायक नलावडे , तात्या गायकवाड चालक चाटे यांच्या पथकाने केली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment