भाजपा महिला आघाडी मोर्चा यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
भा ज प महिला आघाडी मोर्चा यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
पंढरपूर(प्रतिनीधी)
महामानव भारतरत्न
, संविधानाचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी च्या वतीने
सोमवार दि.१४एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांचा जो संदेश होता शिका आणि सक्षम व्हा या सूत्रानुसार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारा समाज आणि त्या समाजाला घडवणारे हे सर्व दिग्गज नेते यांना अभिवादन करताना अतिशय मनापासून आनंद वाटतोय बाबासाहेबांना आदरांजली वाहताना आज महिला ह्या सक्षम झाल्यात हेच यावरून सिद्ध होते, समस्त महिलांच्या सबलीकरणात आणि सक्षमीकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे.
असे मत डॉ प्राजक्ता बेणारे यांनी व्यक्त केले.
स्टेशन रोड येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी करताना डॉ प्राजक्ता बेणारे , जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण,
जिल्हा सरचिटणीस व जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे,
भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष सौ शिल्पा म्हमाणे
जिल्हाचिटणीस अंजना जाधव,
भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष सौ सुवर्णाताई कुरणावळ उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment