विस्थापित नगर येथे मिक्सर चा स्फोट होऊन महीला ठार.
विस्थापित नगर येथे मिक्सर चा स्फोट होऊन महीला ठार.
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील भक्ती मार्ग परिसरातील विस्थापित नगर येथे एका बेकायदेशीर घरात शोभेच्या दारूचा स्फोट होऊन एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला.
हि भयानक व दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक २एप्रिल रोजी विस्थापित नगर येथे सायंकाळी सहा वाजता घडली.
या स्फोटात मयुरी अक्षय मेनकुदळे(वय २४, रा. विस्थापित नगर,भक्ती मार्ग)
ही महिला जागीच ठार झाली.
या ठिकाणी मागील ६ महिन्यापासून बेकायदेशीर शोभेच्या दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
ही महिला मिक्सर मध्ये शोभेची घट्ट झालेली दारू बारीक करीत असताना अचानक भीषण स्फोट झाला.
या स्फोटात या महिलेचा हात उडून दूर पडला.
यानंतर लगेच काही मिनिटातच सदर महिलेस उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच मयुरी मेनकुदळे यांचं मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
हे जोडपे एक वर्षापूर्वी राहण्यास आले
होते .तसेच ६महिन्यापासून घरा शेजारील पत्रा शेड मध्ये बेकायदेशीर शोभेच्या दारूचा कारखाना चालवीत होते.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आधिक तपास करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment