भा ज पा महीला पदाधिकाऱ्यांनी साधला महीला भाजी विक्रेत्यांशी संवाद.


 भा ज प महीला पदाधिकाऱ्यांनी साधला महीला भाजी विक्रेत्यांशी संवाद.

पंढरपूर (प्रतिनिधी) भा ज प महीला पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी बुधवार दिनांक २४ रोजी नवी पेठ येथील जुन्या भाजी मंडई मध्यें जाऊन संवाद साधला.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी च्या वतीने पंढरपुरातील जुने भाजीपाला मार्केट , पुढे नवी पेठ  ठिकाणी सर्व शेतकरी भाजीविक्रेत्या महिला यांच्याशी संवाद साधला .

त्यांच्यासोबत पोळी भाजी भाकरी ठेचा त्याचबरोबर भत्ता कलिंगड कैरी या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना अनेक महिलांनी उस्फूर्तपणे मोदी साहेबांनी काय काय दिले हे आपल्या बोली ग्रामीण भाषेत सांगितले कार्यक्रमाला अनेक भाजी विक्रेत्या महिला या उपस्थित होत्या हा यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सोलापूर ग्रामीण, डॉ  प्राजक्ता बेणारे यांनी मोदी साहेबांच्या महिलांसाठीच्या योजना अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितल्या, तसेच यावेळी शहर उपाध्यक्ष सौ शिल्पा म्हमाणे, यांनी महिलांना तुम्हाला जी काही अडचण येईल ती तुम्ही माझ्याकडे या मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सोडून दिल अशा पद्धतीचे आश्वासन महिलांना दिले त्यामुळे महिलांच्या मध्ये अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण होते याच सोबत महिलांनी रामदादा सातपुते यांना नक्की मतदान करणार असल्याचे सांगितले

डॉ जोती शेटे , शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी  महिला मोर्चा

या संवाद यात्रेच्या वेळी उपाध्यक्ष अपर्णा तारके, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता वगरे,

 जिल्हाचिटणीस अंजना जाधव,  जिल्हा सरचिटणीस सरिता माने, शहर संघटन चिटणीस मेघा मोळक, जिल्हा सरचिटणीस व जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे त्याचबरोबर शहर संघटक धीरज म्हमाणे, भारतीय जनता पार्टी जिल्हा संयोजक श्री बादल सिंग ठाकूर यांनी देखील सर्व भाजीविक्रेतांना मोदी साहेबांच्या योजनांचे महत्त्व समजून सांगितले  कार्यक्रम हा शिल्पा म्हमाणे यांच्या निवासस्थानी पार पडला

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.