पंढरपूर येथे भा ज पा पक्षाच्या वतीने स्थापना दीन उत्साहात साजरा.


 पंढरपूर येथे भा ज प पक्षाचा स्थापना दिन संपन्न.

प्रतिनिधी पंढरपूर -

'सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दुंगा'


या विचाराने प्रेरित होऊन ४४ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.

आज ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला.


 त्याचबरोबर आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंढरपूर या ठिकाणी क्र.८२ व ८३ बुथ मध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे, भारतीय जनता पार्टीचे  आमदार .समाधान दादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात आदरणीय .दिनदयाळ उपाध्याय, .श्यामाप्रसाद मुखर्जी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.


 यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा-महिला मोर्चा कार्यकारणी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका महिला मोर्चा कार्यकारणी,युवा मोर्चा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी सोलापूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.प्राजक्ता बेणारे यांनी वर्धापन दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.


या कार्यक्रमाला जिल्हा मुख्य  कार्यकारिणी महिला उपाध्यक्ष अपर्णा तारके,

जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा .जयश्री क्षीरसागर, 

.ज्योती जोशी-कुलकर्णी,

.सुजाता  वगरे.


जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सौ.सुप्रिया काकडे,

जिल्हा चिटणीस सौ.अंजना जाधव 

तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश किसान मोर्चाच्या महिला पदाधिकारी .विश्रांती  भुसनर,


पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा संगीता ताई कुरणावळ,.सुवर्णताई कुरणावळ,.शिल्पा ताई म्हमाने,शहर सरचिटणीस.मेघा   मोळक.प्रतिभा गानमोटे,


शहर संघटक ,.धीरज  म्हमाने,सोलापूर जिल्हा संयोजक ,.बादल सिंह ठाकूर, प्रशांत सापनेकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.