उत्कंठावर्धक आणि रहस्यमय वेब सिरीज" बापूची गोष्ट "सोशल मीडियावर होत आहे लोकप्रिय
सोलापूर जिल्ह्यातील "बापूची गोष्ट, ही वेबसिरीज होत आहे सोशल मीडियावर लोकप्रिय, पुढच्या भागाची उत्कंठा, पंढरीतील उत्तम दिग्दर्शक तानाजी घाडगे यांच्या दिग्दर्शनाने सोने पे सुहागा,
पंढरीतील कलाकाराचा दमदार अभिनय
चैतन्य उत्पात, पंढरपूर _राजकारणात कोणी कुणाचा सदैव मित्र असत नाही, तसेच शत्रू देखील त्यात गावपातळीवरील राजकारण म्हणजे कोणतेही टोक गाठणारे,
आजच्या धावपळीच्या जीवनातील सामान्य माणसाची जगण्याची धडपड, राजकीय मंडळींचा स्वार्थ,धूर्तपणा, गावकी भावकीतील नातेसंबंध, हरवत चाललेली माणुसकी,
संशय, धूर्त चाली या साऱ्या
बाबींचा आढावा घेऊन सुरू असलेली उत्कंठावर्धक वेबसिरीज म्हणून "बापूची गोष्ट, सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील जाणकार,मुरब्बी दिग्दर्शक तानाजी घाडगे हे ही वेबसिरीज करत आहेत.
माळशिरस,वेळापूर, अकलूज पिलीव या परिसरात वेबसिरीज चे चित्रीकरण सुरू आहे,
अगदी पहिल्या भागापासून रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी उत्कंठावर्धक, रहस्यमय अशी ही वेबसिरीज आहे.
तालुक्याचा राजकारणात आमदारकीचे इलेक्शन लागलेले असते, तीन दिग्गज नेत्यांमध्ये तुल्यबळ नेत्यात प्रबळ चुरस दिसत असतानाच एका गबरगंड उमेदवाराचे एक कोटी रुपये गायब होतात,
हे पैसे आणण्यासाठी संस्थेतील एक शिक्षक आणि ड्रायव्हर यांच्यावर
जबाबदारी दिलेली असते,
पण पोलीस मागे येत आहेत असा समज होऊन हे लोक चालत्या जीप मधून हे एक कोटी रुपये असलेले
पोते उसाच्या शेतात फेकून देतात, नंतर ते त्या जागेवर गेल्यावर पाहतात तर एक कोटी रुपये असलेले पोते गायब झालेले असते,
पापभिरू, अत्यंत कष्टात शेती करणारा बापू याला हे लबाडाचे घबाड, हाती लागते, आणि सुरू होतो एक रोमांचकारी घटनांचा वेगवान प्रवास,स्वार्थ, राजकीय कुरघोडी, सत्तेसाठी सुरू असलेली धडपड, डाव प्रतिडाव याने तालुका ढवळून निघतो,
पैसे पुन्हा मिळविण्यासाठी कुणालाही संशयीत म्हणून उचलण्यात येत असते,
इलेक्शनच्या वाहत्या गंगेत बारके नेते, पैसा, ठेकेदारी मिळवण्यात मग्न तर बापूचा मुलगा चक्क एक पोरगी पटवतो,
बिघडलेले राजकीय गणित, हरवलेला पैसा याने आमदारकीचे स्वप्न पाहणारा पुढारी खवळून उठतो, पण इकडे पाप पुण्याचा विचार करणारा बापू आपली जमीन सावकाराकडे गहाण असताना, रोजचे वांदे असतानाही त्यातील दहा रुपये पण खर्च करीत नाही,
बापूची दमदार भूमिका अकलूज येथील सुजाण अभिनेता धनंजय जमादार यांनी केली आहे. ही वेबसिरीज एवढी गाजत आहे की पुढचा भाग कधी येतोय याची उत्कंठा नेटकऱ्यात वाढत आहे.
पंढरपूर, अकलूज सारख्या निमशहरी भागात एवढी लोकप्रिय, दर्जेदार वेबसिरीज प्रथमच होत आहे, कोणताही पूर्व अनुभव नसताना गावातील कलाकारांनी तोडीस तोड अभिनय केला आहे .
यात पंढरीतील अष्टपैलू कलाकार श्रीकांत महाजन बडवे, प्रतिभा यादव, मुरली शेटे, संजीव मोरे यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या असून बापू ही भूमिका धनंजय जमादार, संग्राम ची भूमिका सोमनाथ वैष्णव, विजू ची भूमिका विजू बोकफोडे, दिलीप ची भूमिका गणेश राशीनकर, मालन ही भूमिका सौ जयश्री बिरलिंगे, संतोष ही भूमिका राकेश रमेश राखले, विलास ही व्यक्तिरेखा सोमनाथ पाटील, चंदू ही भूमिका शुभम चौधरी स्नेहल _स्नेहल महाजन, भारत _भारत गायकवाड, दुकानदार _दीपक जाधव, बाळासाहेब _विजय देवकर, सरपंचबाई _प्रतिभा यादव, सदा _लखन साठे, पेरूवाला _मारुती जाधव, दत्ता _श्रीकांत महाजन बडवे, कॉन्ट्रॅक्टर टेके _राजेंद्र घोगरे, संग्रहाची बायको_सौ सोनाली चांडोले , जगू _जगू घाडगे, विजुची बायको_छाया आधट , तसेच ईतर भूमिकेत संजीव मोरे, बीरा गोरड, अमरदीप, शुभांगी जाधव, वैभव कुलथे, रोहित वागज, सचिन बोरावके , युवराज वळकुदे , वैष्णवी टेके, सत्यजित कोळेकर, नाना शेंडगे, राहुल गोडसे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
कॅमेरा, सिनेमॅटोग्राफी विशाल बोडके यांची आहे, कॅमेरा सहाय्यक सुरज बोरगावकर, आदित्य भंडारे, चैतन्य गायकवाड यांचे असून ड्रोन शूटिंग शुभम जामदार यांनी केले आहे. ग्राफिक्स सहाय्यक म्हणून विशाल शिंदे यांनी काम केले आहे.
एक उत्तम, परिपूर्ण, मानवी मनाचा ठाव घेणारी उत्कंठावर्धक रहस्यमय अशी ही वेबसिरीज आहे.


Comments
Post a Comment