अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई.
अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पंढरपूर तालुका पोलिसांकडून कारवाई.
पंढरपूर(प्रतिनिधी )_
सोलापुरातून पंढरपुरातील ग्रामीण भागामध्ये स्कुटीवर खताच्या पोत्यामध्ये मोटारीच्या ट्यूबमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला, पंढरपूर तालुका पोलिसांनी पकडले.
दि. १८ सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोलापुरातील एक व्यक्ती स्कुटीगाडीवर खताच्या पोत्यामध्ये आतील बाजूस मोटारीचे ट्यूबमध्ये दारू भरून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये आणून, विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने , पंढरपूर तालुका मौजे देगाव रोडवर जाणाऱ्या स्कुटी चालकाला थांबून विचारपूस केली असता, आपले नाव आप्पा नारायण राहणार मार्डी रोड रोड उत्तर तालुका सोलापूर असे सांगितले.
त्याच्या ताब्यात एक स्कुटी गाडी मिळुन आली. या गाडीच्या मध्यभागी एक खताचे कव्हर असलेले होते. त्याच्या आतमध्ये मोटार जे ट्यूब त्यामध्ये उग्र वासाची दारू भरलेले एकूण शंभर लिटर दारू असून , सदर व्यक्तीने दारूची वाहतूक करण्यासाठी आताच्या पोत्यामध्ये मोटारीच्या टू मध्ये सुमारे १०० लिटर दारू भरून स्कुटी मोटरसायकलवर सोलापूर येथून पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आलेला आहे. सदर व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र पोलीस दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, सदर व्यक्तीच्या ताब्यातून मुद्देमाल त्यामध्ये एक स्कुटी मोटरसायकल व युरियाच्या पोत्यामध्ये मोठ्या ट्यूब मध्ये भरलेली १०० लिटर दारू असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हवालदार स्वप्निल वाडदेकर, पोलीस हवालदार साजन भोसले, पोलीस हवालदार इरफान शेख ,पोलीस कॉन्स्टेबल घोंगाने , सागर गवळी ,पोलीस हवालदार मंगेश रोकडे यांच्या पथकाने केली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment