श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन.


 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती वतीने 

श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन,


कलापिनी कोमकली, पं.आनंद भाटे, पं.शौनक अभिषेकी, मधुरा किरपेकर, सानिका कुलकर्णी, ज्ञानेश्वर मेश्राम, श्रृती देशपांडे, सीमा जोशी दिग्गजांची उपस्थिती


पंढरपूर दि.20:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अणेचा यांचे उपस्थितीत  दिनांक 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत 7 दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम भवन येथे दुपारी 5.30 ते 7.00 आणि रात्री 7.30 वा. या दोन सत्रांमध्ये श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

 दि.23 सप्टेंबर रोजी दुपारी स्नेहल देशपांडे भरतनाट्यम व रात्री कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली,  दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी भरतनाट्यम "परब्रह्मा" सीमा जोशी व रात्री भिमसेन जोशी यांचे शिष्य पं.आनंद भाटे यांचे गायन, दि.25 सप्टेंबर रोजी प्रेरणा जोशी नृत्यांजली आणि रात्री भैरवी किरपेकर आणि मधूरा किरपेकर यांचे गायन, दि.26 सप्टेंबर रोजी दुपारी स्वर पंढरी महेश काळे यांचा शिष्य परिवार यांचे गायन आणि रात्री ज्ञानेश्वर मेश्राम यांची अभंगवाणी, दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी  लक्ष्मी बडवे शिष्य परिवार भरतनाट्यम तर रात्री सानिका कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन आणि अभंगगंध, दि.28सप्टेंबर रोजी दुपारी सौरभ नाईक गायन चेन्नई रात्री पं.शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन, दि.29 रोजी सप्टेंबर रोजी दुपारी श्रृती देशपांडे अभंगायन तर रात्री किर्तीकुमार बडषेसी बेंगलोर यांचे गायनाने  नवरात्र संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.

यासाठी ख्यातनाम साथसंगत कलाकारांची लाभणार असून पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक कलाप्रेमी आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात येत आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.