आ. अभिजीत पाटील यांनी केली नीरा नदीच्या काठी पूरपरिस्थितीची पाहणी.


 *आमदार अभिजीत पाटील यांच्याकडून सीना नदी काटच्या गावाच्या पूरपरिस्थितीची केली पाहणी*


*शासकीय यंत्रणाना दिले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश* आमदार अभिजीत पाटील


*मुख्यमंत्री यांना भेटून माढा, पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या पूर परिस्थिती नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचे दिले पत्र*


(तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांचे सोबत केली पाहणी)

पंढरपूर 

(प्रतिनिधी)

राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनास तत्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव-माढा , दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड , वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी चांदने साहेब यांना सोबत घेऊन पाहणी आमदार अभिजीत पाटील यांनी केली.


सदर माढा तालुक्यातील रांझणी, रोपळे कव्हे , म्हैसगाव कुर्डवाडी या ४ मंडलात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बर्‍याच भागात शेतात पुराचे पाण्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे. शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान खुप जास्त झाले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.. 


शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक आहे. म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सोबत घेऊन पूरबाधीत भागात जाऊन कर्तव्य बजावले. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशू धनाची हानी, संसारोपयोगी साहित्य आदींचे वस्तूंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने माढा तहसीलदार संजय भोसले यांचे कडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे..


माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून माढा, पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी पत्र ही दिल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.