शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती त्वरित करा. युवा शैक्षणिक व सामाजिक
संघटनेची मागणी : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन दिले.
पंढरपूर (प्रतिनिधी)जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील शिक्षकासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रताधारक तरुणांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र राज्य व गावातील विद्यार्थी व जागरूक नागरिक यांच्यातर्फे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १७) दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे बुधवारी विषेश ग्रामसभेचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनातून जि.प. शाळा म्हणजे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एकमेव शैक्षणिक आधार आहे. मात्र जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी अपात्र अथवा तात्पुरत्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन गावातील पात्रताधारक तरुणांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना पात्रताधारक तरुण अजय पवार , संदीप देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment