कासेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण माजी जिपसदस्य श्री वसंतनाना देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
कासेगाव मधील जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण मा. श्री. वसंत नाना देशमुख यांच्या हस्ते .
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील
कासेगाव येथील दाते मंगल कार्यालयाच्या पाठीमागील श्री. भुवनेश्वरी जलकुंभ पाण्याच्या टाकीचा जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेच्या शुभारंभ सोमवारी मा. श्री.वसंत नाना देशमुख यांच्या हस्ते, करण्यात आला.यावेळी विलास मस्के. पाणीपुरवठा समिती अध्यक्ष नितीन करवते उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सदाशिव पुजारी, सरपंच शोभा भोसले , उपसरपंच संग्राम भैय्या देशमुख वार्ड चे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दाजीप्पा देशमुख
व सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी सौ. सुजाता भोसले व भारतीय जनता पार्टीचे किशोर धोत्रे. प्रमोद देशमुख साहेब. भिकाजी जाधव व सदाशिव आबा जाधव या सर्वांच्या उपस्थितीत पाण्याचे वाल चे पूजन करून , नारळ फोडून पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आला. व पाणी चालू करण्यात आले.
यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांनी आपल्या भाषणात असे म्हणाले की. ग्रामपंचायत च्या वतीने या भागातील योजना विशेष प्रयत्न करून पूर्ण केल्या जातील.सरपंच सौ.शोभाताई भोसले यांनी ग्रामपंचायत योजनेची माहिती दिली, तसेच उपसरपंच संग्राम भैय्या देशमुख यांनी प्लॉटिंग एरियामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला निधी अपुरा पडत असल्याचे सांगितले, या भागातील चालू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामास दहा लाख रुपये निधी दिला जाईल.
तसेच वार्डातील नं.3 ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दाजीप्पा देशमुख यांनी वार्डातील ड्रेनेज लाईन चे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे सांगितले.
तसेच या भागातील नागरिकांनी ड्रेनेज लाईन ,रोड लाईट , रस्ता च्या समस्या सांगितल्या व निवेदने दिले. व लवकरात लवकर चालू कामे पूर्ण करण्याची मागणी केली.
उपस्थित प्रमुख मान्यवरांचा व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी यांचा हार ,श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
श्री.विश्वकर्मा गुमास्ता कॉलनी, राजेंद्र नगर, सिटीजन पार्क व मारुती मंदिर परिसरातील नागरिक ड्रेनेज लाईन, रोडलाईटच्या व पक्के रस्ते कामाचा सहा ते सात वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
' हर घर नल ' योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला व प्लॉटिंग एरिया मध्ये घरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा ची कमतरता भासत आहे. असे सुधीर थिटे यांनी सांगितले सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गणेश भोसले.
श्री विठ्ठल वाघोलीकर यांनी शोष खड्ड्यातील घाण पाण्याचे परपुलेशन बोअरच्या पाण्यात होत असल्याचे सांगितले. ड्रेनेज लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करायची मागणी केली.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुधीर थिटे, बंडू पालसांडे, गणेश भोसले, रोहित राऊत, तानाजी चौधरी, प्रकाश ढोबळे, विजय देवमारे आदींनी परिश्रम घेतले
, पांडुरंग शिंदे,नवनाथ मोहोळकर, पांडुरंग बोडके,सचिन आदापुरे, तसेच बापूसाहेब थिटे व सचिन धुमाळ ,
नागणे काका, राजाभाऊ रोकडे , चाचा बागवान, पांडुरंग गोडसे,प्रकाश आण्णा महाराज जोशी. रोहित बागडे ,सातुरे साहेब, संतोष कवठेकर. व महिलांमध्ये सौ. राणी पालसांडे , सौ. ढोबळे, सौ. आशा कांबळे, शेख भाभी, सौ. दुर्गा गोयल व सौ. सोलंकी व इतर सर्व उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास सर्व सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक महिला व तरुण वर्ग उपस्थित होते. पिण्याचे पाणी चालू झाल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना अल्पोपार , चहा व पाणी वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर थिटे यांनी केले.उपस्थितांचे आभार रोहित राऊत यांनी मानले .
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment