प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी १० कोटी ५६ लाख रुपये मंजूर. आ. समाधान आवताडे.


 *प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून मंगळवेढा तालुक्यासाठी १० कोटी ५६ लाख रुपये मंजूर - आ आवताडे*

पंढरपूर

प्रतिनिधी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन २००० पासून राबविण्यात येत आहे.या योजनेची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सन २००१ च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात १००० पेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे जोडणे हा आहे  सध्या केंद्र सरकारने न जोडलेल्या बिगर आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त, आदिवासी भागातील २५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्हयातील १०० ते २४९ लोकसंख्या असलेल्या वाडया-वस्त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यामध्ये रस्ते सुधारण्यासाठी दहा कोटी ५६ लाख १८ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे या मंजूर निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी ते खुपसगी हा ५.३ किमी रस्ता करण्यात येणार आहे या रस्त्यासाठी ४ कोटी ५० लाख ४९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे तर गणेशवाडी पाटखळ ते डोंगरगाव ७.७ किमी या रस्त्यासाठी ६ कोटी पाच लाख ६९ हजार रुपये निधी मंजूर झाला असून या कामांच्या प्रशासकीय मान्यता लवकरच येणार आहेत अनेक दिवसापासून हा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांची वारंवार रस्ता दुरुस्तीसाठी मागणी होत होती त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीसाठी राज्य व केंद्राकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता त्यानुसार या रस्त्यांना निधी मंजूर झाला असून नागरिकांची रस्त्यावरून येताना होणारी तारांबळ आता थांबणार आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.