पंढरीत सहजयोग महोत्सव, सात देशातील २ हजार साधक राहणार उपस्थित.
पंढरीत सहज योग महोत्सव
सात देशातील २हजार साधक राहणार उपस्थित.
पंढरपूर - ( प्रतिनिधी)जगभरात सहज योग च्या माध्यमातून मानवी जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त पंढरपूर येथे दि. १ ते ४नोव्हेंबर सहज योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यास सात देशातील २हजार साधक उपस्थित राहणार आहेत.
याबाबत येथील सहज योग साधकांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यास कुमार कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, बाबासाहेब लवटे, युवराज कोळी, सचिन वाघमारे, सांगली येथील शशिकांत कुंभोजकर आदी उपस्थित होते.
श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त देशभरातील प्रमुख शहरात सहज योग महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सदर महोत्सव होत असून यास भारतातील तसेच रशिया, फ्रान्स, कझिकस्तान, नेपाळ, अमेरिका आदी देशातील जवळपास २ हजार साधक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दि. १नोव्हेंबर रोजी कार रॅली होणार आहे. दि. २ रोजी संत तुकाराम भवन येथे सायंकाळी ५:३० वाजता भजन संध्या, दि. ३ नोव्हेंबर रोजी टिळक स्मारक मैदानात सायंकाळी साडेपाच वाजता दीपोत्सव होणार असून यामध्ये 7 हजार दिवे लावले जाणार आहेत. तसेच महाआरती देखील होणार आहे. दि.४नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रेल्वे मैदान येथे प्रदर्शन व आत्मसाक्षात्कार सोहळा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यासह सहज योग साधक शहरातील व तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, साखर कारखाने, सूतगिरणी, शासकीय कार्यालय येथे सहज योग समाधी बाबत माहिती दिली जाणार आहे.
सदर सर्व महोत्सवाचे कार्यक्रम मोफत असून नागरिकांनी यास उपस्थित राहून सहज योग समाधीचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment