विविध मागण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा.


 विविध मागण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

 पंढरपूर -(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी दि ३०ऑक्टोंबर २०२३ रोजी बेमुदत आमरण उपोषण  करण्याचा निर्णय राज्य संघर्ष समितीने घेतलेला आहे. 

 यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्रित करून राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.


 महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व सचिवांसह मीटिंग झाली होती.

 या मीटिंगमध्ये अनेक निर्णय होऊन  सुद्धा अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालया समोर पाच हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह  बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय राज्याचे कामगार नेते डॉ.डी एल कराड, अँड. सुरेश ठाकूर, डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा, संतोष पवार, अनिल जाधव, अँड.सुनिल वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली  घेण्यात आला आहे .


या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनील वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष काँ. सिद्धाप्पा कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नानासाहेब वाघमारे, महादेव कांबळे, राम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल बावटा  कार्यालय दत्त नगर येथे मीटिंग संपन्न झाली.


 यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत बाबत औरंगाबाद खंडपीठ यांनी जो स्थगिती आदेश दिला आहे तो उठवण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी व शासनातर्फे चांगला विधीज्ञ नेमून लवकरात लवकर स्थगिती आदेश उठवून महाराष्ट्रातल्या बौद्ध मातंग व इतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देणे आवश्यक आहे,  महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नगरपालिकांना मिळावे, नव्याने स्थापन झालेल्या  नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना व सफाई कर्मचारी यांना विना शर्त विना अट कोणतेही शैक्षणिक अहार्ता अट न घालता समावेशन करावे व सफाई कर्मचारी यांची आकृतिबंधा मध्ये पदे निर्माण करून त्यांना विना शर्त विना अट सेवेत कायम करावे व सेवेत असताना मयत झाल्यास अनुकंपा व वारसा हक्क योजना लागू करावी, स्वच्छता व आरोग्य निरीक्षक  यांचे विकल्प त्वरित मागवून त्वरित त्यांचे समावेशन करावे, तसेच कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत  कायम करावे व सेवेत कायम होईपर्यंत समान काम समान वेतन प्रमाणे किमान वेतन देण्यात यावे तसेच गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपा ची सर्व पदे त्वरित भरावीत, नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना वरिष्ठ पदोन्नती मिळावी व १२ वर्ष व २४ वर्षाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा तसेच १०,२०,३० ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत त्वरित आदेश निर्गमित करावेत , सेवानिवृत्त झालेल्या सर्व सफाई व इतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे उपदान व रजा वेतन वेतन हे त्वरित मिळावे, महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे त्वरित देण्यात यावीत, संवर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या समुपदेशन द्वारे करावे गैरसोयीच्या बदल्या टाळाव्यात तसेच सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात व इतर सर्व मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेसमोर सकाळी ११ वाजता मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी यांनी केले यावेळी पंढरपूर, मंगळवेढा,अक्कलकोट, करमाळा, मैंदर्गी, दुधनी, कुर्डवाडी नातेपुते, माळशिरस, महाळुंग, माढा बार्शी सांगोला वैराग या नगरपरिषदेमधील कामगार नेते नानासाहेब वाघमारे, धनराज कांबळे,संतोष सर्वगोड,राम पवार, खाजाप्पा दादानवरू, महादेव कांबळे प्रदीप शिंदे दादासाहेब कांबळे शरद वाघमारे नागनाथ तोडकर बाबासाहेब पवार  सुनील मदने, दत्ता कुर्डे, राजाभाऊ व्यवहारे दिनेश साठी धनंजय वाघमारे  संभाजी अवघडे विकास ओव्हाळ गोविंद पारखे नुरदिन खलिपा हे उपस्थित होते

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.