संशयी नवऱ्याचा बायकोनेच घेतला जीव. नदीत टाकला मृतदेह.
बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पोत्यात बांधून नदीत टाकला मृतदेह.
प्रतिनिधी, पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील भीमा नदीच्या बंधाऱ्यात एका युवकाचे पोत्यात बांधलेले प्रेत आढळल्याने खळबळ उडाली होती, या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता संदीप याची बायको शीतल आणि नातेवाईक मंगेश अंबादास पडळकर (रा.कासेगाव, ता. पंढरपूर) यांनीच संदीप आपली बायको शीतल हिच्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याने त्याचा गळा दाबून ठार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवार दि.१९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात गुरसाळे बंधाऱ्यात संदीप अर्जुन माने( वय,३४, रा. बामणी, ता सांगोला, हल्ली रा.कासेगाव, ता . पंढरपूर) याचा बारदाना पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला.होता.
ग्रामस्थांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती.
विशेष म्हणजे आरोपी असलेल्या शीतल हिनेच आपला पती राजस्थान येथे जातो, असे सांगून गायब झाला असल्याची तक्रार दिली होती.
संदीप माने आपली पत्नी शीतल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असे.
या प्रकरणी आरोपी पत्नी शीतल व नातेवाईक मंगेश पडळकर यांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment