पंढरीत ऐतिहासिक एकनाथी भागवत प्रजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा.
पंढरीत ऐतिहासिक एकनाथी भागवत गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा.
पंढरपूर : (प्रतिनिधी) वारकरी संप्रदाय परंपरेतील थोर संत शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराज यांच्या जलसमाधीस ४२५ वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास ४५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत योगाप्रित्यर्थ ४५० वर्षांपूर्वी नाथमहाराज व ‘भागवत ग्रंथाचा सन्मान’ पवित्र काशीक्षेत्री विद्वानांच्या उपस्थितीत झाला. गजारुढ दिंडी सोहळ्याने अर्थात हत्तीवर ग्रंथ मिरवणूक करुन गौरव झाला होता. त्याच पद्धतीने व त्याच स्मृती जागवण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अश्विन शुद्ध १ शके १९४५ घटस्थापना नवरात्रारंभ या शुभदिनी रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ९वा. ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवत गजारुढ ‘ग्रंथ’ दिंडी सोहळा होणार आहे. ह्या दिंडी सोहळ्याची सुरुवात श्रीसंत नामदेवमहाराज पायरी पासून होऊन संपूर्ण प्रदक्षिणा मार्गे निघेल.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती तथा आशिर्वाद श्रीसंत एकनाथमहाराजांचे विद्यमान वंशजांसह सकलसंतांचे वंशज, पंढरपूर येथील सर्व मान्यवर फडकरी, मठाधिपती, संस्थानिक, सर्व वारकरी शिक्षण संस्था सर्व वारकरी संघटना. तसेच चातुर्मास वारकरी साधक यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे.
या सोहळ्याला सर्व वारकरी, भाविकभक्त, व्यापारी, नागरिक तसेच लहान थोरांनी उपस्थित राहून शांतीब्रह्म एकनाथमहाराजांचा ‘गौरव सोहळा’ साजरा करावा असे आवाहन संयोजक व निमंत्रक ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर, वारकरी संप्रदाय पाईक संघ व ह.भ.प.डॉ. भागवत कानडे समर्थ प्रतिष्ठानचे वतीने करण्यात येत आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment