राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई, सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त.


 *राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर जिल्हाभरात छापे* 

दोन मोटरसायकलींसह सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी पंढरपूर 


राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई करत वीस गुन्ह्यात 520 लिटर हातभट्टी दारू, 21 हजार 280 लिटर रसायनासह दोन वाहने असा नऊ लाख 18 हजार 602 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 


सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेडरपूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय 23 वर्षे राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक MH13 CN 4511 वरून मध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून चौदा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील अजय देसू जाधव वय 27 वर्षे याच्या ताब्यातून प्लास्टिक बॅरल मधील 2200 लिटर व लोखंडी बॅरल मधील 200 लिटर रसायन जप्त करून नाश केले. सिताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात 4900 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावचे हद्दीतील पारधी वस्तीच्या दक्षिणेस असलेल्या सरकारी ओढ्याकाठी छापा टाकून त्या ठिकाणी साडेचारशे लिटर रसायन नाश करण्यात आले. माळशिरस विभागाचे पथकाने सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या हद्दीतील हातभट्टीवर छापे टाकून शंकर मोहन चव्हाण वय 40 वर्षे रा. निमगाव या इसमाला 500 लिटर रसायन व सत्तर लिटर हातभट्टी दारूसह अटक केली. तसेच महूद येथील दत्तू भगवान जाधव याच्या घरातून 230 लिटर रसायन जप्त करून नाश केले. या पथकाने महूद गावाच्या हद्दीतील बेघरवस्ती या ठिकाणी एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून चारशे लिटर रसायन जागीच नाश केले.  निरीक्षक अ विभागाचे पथकाने सोलापूर शहर परिसरातील विनायक नगर एमआयडीसी रोड परिसरात व्यंकटेश सोमनाथ दोमल याच्या ताब्यातून 650 लिटर क्षमतेचे 96 फ्रुट बिअरच्या बाटल्या, बापूजी नगर परिसरात अंजनप्पा हणमंतु म्हेत्रे याच्या ताब्यातून 48 फ्रुट बियरच्या बाटल्या व राधाबाई भिमण्णा अनमोललू या महिलेच्या ताब्यातून 120 फ्रुट बियरच्या बाटल्या जप्त केल्या. एका अन्य कारवाईत भारतरत्न इंदिरानगर परिसरातील राजू विलास बंदपट्टे याच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू, जुना कुंभारी नाका परिसरातील हणमंतु विष्णू देशमुख याच्या ताब्यातून 23 लिटर हातभट्टी दारु व गवळी वस्ती एमआयडीसी रोड परिसरातील लक्ष्मण हणमंतु कोंगारी याच्या ताब्यातून 35 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने मरीआई चौकात एका इसमास त्याच्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी 125 मोटरसायकल क्रमांक MH13 DU 5312 वरून रबरी ट्यूब मध्ये 60 लिटर दारूची वाहतूक करताना पाठलाग केला असता आरोपी मोटरसायकल जागेवरच सोडून फरार झाला. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील, सचिन भवड, पंकज कुंभार , दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, अंजली सरवदे, सुखदेव सिद, समाधान शेळके, सुरेश झगडे, धनाजी पोवार, सौरभ भोसले ,बाळू नेवसे, दत्तात्रय पाटील ,श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, जीवन मुंढे, गजानन होळकर व जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

संपादक

चैतन्य उत्पात..


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.