डॉ मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाच्या संशोधन विभागाकडून पुरस्कार.


 स्वेरीच्या डॉ. मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाकडून संशोधन पुरस्कार प्राप्त

पंढरपूर-प्रतिनीधी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन  पुरुषोत्तम ठाकरे यांना विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल दिल्ली येथील केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३८ व्या भारतीय अभियांत्रिकी संमेलनाच्या जबलपूर (मध्य प्रदेश) मधील हॉटेल रॉयल ऑर्बिट मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.

         स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या  डॉ. ठाकरे यांच्या ‘इंटरलाइन पॉवर फ्लो कंट्रोलर (आयपीएफसी)’ दीर्घ प्रसारण लाईन्समध्ये तैनात करणे आणि त्याचा डिस्टन्स रिलेसवर होणारा परिणाम’ या शीर्षकाच्या पुरस्कार विजेत्या पेपरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या या संशोधनाने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला मौल्यवान योगदान प्राप्त झाले आहे. या सन्मानामुळे डॉ. ठाकरे यांचे कार्य इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात  विशेष लक्षवेधी ठरले आहे. या पुरस्काराने  स्वेरीच्या संशोधन आणि विकास कार्यास बळकटी मिळाली आहे. डॉ. मोहन पी. ठाकरे यांनी विविध प्रतिष्ठित जर्नल्स आणि परिषदांमध्ये एस.सी.आय. आणि स्कोपस इंडेक्स जर्नल्स मध्ये १२१ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. त्यांची गुगल स्कॉलर संदर्भ संख्या ८९० आणि एच-इंडेक्स १७ आहे. गत वर्षात डॉ. ठाकरे यांनी प्रतिष्ठित जर्नल्समध्ये जवळपास आठ स्कोपस-इंडेक्स केलेले जर्नल पेपर्स प्रकाशित करून विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या वर्षातच, डॉ. ठाकरे यांनी स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान, बॅटरी व्यवस्थापनासह इलेक्ट्रिक वाहने, फॅकट्स तंत्रज्ञान, मशीन ड्राईव्ज, एसी ट्रान्समिशन लाईन्स प्रोटेक्शन आणि एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन्स यावर लक्ष केंद्रित करणारे १३ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत.डॉ. ठाकरे यांनी दोन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स (एफडीपी) आयोजित करण्यासाठी रु.७ लाखांचा निधी एआयसीटीई कडुन प्राप्त केला आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे डॉ. ठाकरे यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉ. मोहन ठाकरे यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

संपादक.

चैतन्य उत्पात



Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.